तुमच्याकडे 25 पैशाचं हे नाणं आहे? मिळेल घरबसल्या लखपती बनण्याची सुवर्णसंधी

तुमच्याकडे 25 पैशाचं हे नाणं आहे? मिळेल घरबसल्या लखपती बनण्याची सुवर्णसंधी

जर तुमच्याकडे 25 पैशाचे हे खास नाणे असल्यास थेट 1.5 लाख रुपये तुमच्या मालकीचे होऊ शकतात. तुम्हाला 25 पैशाच्या अँटिक नाण्याचा फोटो या बेवसाइटवर पोस्ट करावा लागेल.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : अनेकांना विविध प्रकारची नाणी जमवण्याचा विशेष छंद असतो. जुनी-नवी सर्व प्रकारची नाणी अनेकजण जपून ठेवतात. तुम्हाला देखील असाच छंद असेल आणि काही वर्षांपूर्वी चलनात असणारं 25 पैशांचं नाणं तुम्ही जपून ठेवलं असेल तर तुमच्यासमोर लखपती बनण्याची संधी आहे. तुम्ही 25 पैशांचं नाणं विकून लखपती होऊ शकता. याकरता तुम्हाला विशेष कष्ट देखील घ्यावे लागणार नाही. तुमच्याकडे हे नाणं असल्यास थेट 1.5 लाख रुपये तुमचे होतील. तुम्हाला या अँटिक नाण्याचा फोटो वेबसाइटवर पोस्ट करावा लागेल, ज्यानंतर हे नाणं विकत घेऊ इच्छिणारी लोकं तुमच्या नाण्यावर बोली लावतील आणि तुम्हाला हवं त्यांना हे नाणं विकता येईल.

जाणून घ्या अशाप्रकारे लखपती होण्यासाठी कोणत्या प्रकारच्या 25 पैशांच्या नाण्याची आवश्यकता आहे, ज्यातून तुम्ही भरभक्कम कमाई करू शकता-

कोणतं नाणं बनवेल लखपती?

मीडिया अहवालांच्या मते, इंडिया मार्ट वेबसाइटवर जुन्या नोटा आणि नाण्यांचा लीलाव होत आहे. अशाप्रकारे नोटा-नाणी गोळा करण्याचा तुम्हाला छंद असेल तर तुम्ही लखपती होऊ शकता. याकरता तुमच्याकडे 25 पैशांचं नाणं असलं पाहिजे जे चंदेरी रंगाचं असेल. हे नाणं लीलावात विकून तुम्ही 1.5 लाखापर्यंत रक्कम मिळवू शकता. याशिवाय या नाण्यांच्या विक्रीवेळी तुम्ही मोलभाव देखील करू शकता.

(हे वाचा-मोदी सरकारचं खास गिफ्ट!दसऱ्याआधीच 30 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळी बोनस)

कुठे विकता येतील ही नाणी?

मीडिया अहवालानुसार इंडिया मार्टवर ही नाणी विकून चांगली रक्कम घरबसल्या मिळवू शकता. कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही ही नाणी विकू शकता.

वैष्णो देवी असणाऱ्या 5 आणि 10 रुपयांची नाणी विकूनही होईल कमाई

इंडिया मार्ट वेबसाईटवर होणाऱ्या जुन्या नाण्यांच्या आणि नोटांच्या लिलावामध्ये तुम्ही 5 किंवा 10 रुपयांची नाणी विकू शकता. मात्र या नाण्यांवर वैष्णो देवी असायला हवी.  वैष्णौ देवी असणारी नाणी 2002 साली जारी करण्यात आली आहेत. देवी असल्याने या नाण्यांना लोक नशीबवान मानतात आणि त्यामुळे या नाण्यांसाठी लोक लाखो रुपये खर्च करत आहेत.

(हे वाचा-Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी वाढ, चांदी 1448 रुपयांनी महागली)

या नोटा विकून मिळतील 25 हजार रुपये

ब्रिटीशकालीन भारतात अशा काही नोटा चलनात होत्या, ज्यांबद्दल आता अनेकांना माहितही नसेल. आधीच्या काळात 10 च्या नोटेवर अशोक स्तंभ होता. ही नोट आता दुर्लभ झाली आहे, पण जर तुमच्याकडे ही नोट असेल तर तुमचे नशीब चमकू शकते. या नोटेच्या बदल्यात तुम्हाला 20 ते 25 हजार रुपये मिळू शकतात. तुम्ही घरबसल्याच या नोटेची विक्री करू शकता.

या वेबसाईटवर करू शकता नाण्यांचा लिलाव

https://dir.indiamart.com/impcat/old-coins.html

https://in.pinterest.com/080841052o/sell-old-coins/

http://www.indiancurrencies.com/

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 22, 2020, 9:59 AM IST
Tags: money

ताज्या बातम्या