मराठी बातम्या /बातम्या /मनी /केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत मिळतील दरमाह 3000 रुपये; तुम्ही पात्र आहात का? लगेच तपासा

केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत मिळतील दरमाह 3000 रुपये; तुम्ही पात्र आहात का? लगेच तपासा

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन (PM Shram Yogi Mandhan Yojna) योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बचत बँक खाते आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. व्यक्तीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन (PM Shram Yogi Mandhan Yojna) योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बचत बँक खाते आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. व्यक्तीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन (PM Shram Yogi Mandhan Yojna) योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बचत बँक खाते आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. व्यक्तीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

नवी दिल्ली, 25 डिसेंबर : केंद्र सरकार असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी (Workers in the unorganized sector) अनेक योजना राबवत आहे, त्यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (PM Shram Yogi Mandhan Yojna). या योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेते, रिक्षाचालक, बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांचे वृद्धापकाळ सुरक्षित करण्यासाठी मदत केली जाईल.

या योजनेंतर्गत सरकार कामगारांना पेन्शनची (Pension) हमी देते. या योजनेत तुम्ही दररोज फक्त 2 रुपये वाचवून वार्षिक 36000 रुपये पेन्शन मिळवू शकता. चला तर मग या प्रधानमंत्री श्रम योगी योजनेबद्दलची माहिती जाणून घेऊया.

एका महिन्यात 55 रुपये जमा करावे लागतील

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन ही योजना सुरू केल्यावर, तुम्हाला दरमहा 55 रुपये जमा करावे लागतील, म्हणजेच दररोज 2 रुपयांपेक्षा कमी पैसे जमा करावे लागतील. म्हणजेच, 18 व्या वर्षी दररोज सुमारे 2 रुपये वाचवून, तुम्हाला वार्षिक 36000 रुपये पेन्शन मिळू शकते.

'या' मल्टीबॅगर स्टॉकमुळ गुंतवणूकदार बनले करोडपती; 97 पैशांचा स्टॉक 194 रुपयांवर

जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 40 व्या वर्षापासून ही योजना सुरू केली तर त्याला दरमहा 200 रुपये जमा करावे लागतील. तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षानंतर पेन्शन मिळू लागेल. 60 वर्षांनंतर तुम्हाला दरमहा 3000 रुपये म्हणजेच वर्षाला 36000 रुपये पेन्शन मिळेल.

कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बचत बँक खाते आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. व्यक्तीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

मागील आठवड्यात 31 स्मॉलकॅप शेअरमध्ये 10-34 टक्के तेजी; पुढील आठवड्यात कशी असेल चाल

नोंदणी कशी करावी लागेल?

नोंदणीसाठी तुम्हाला कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये योजनेसाठी नोंदणी करावी लागेल. कामगार CSC केंद्रात पोर्टलवर स्वतःची नोंदणी करू शकतात. सरकारने या योजनेसाठी वेब पोर्टल तयार केले आहे. या केंद्रांद्वारे ऑनलाइन सर्व माहिती भारत सरकारकडे जाईल.

ही माहिती देणे आवश्यक

नोंदणीसाठी, तुम्हाला तुमचे आधार कार्ड, बचत किंवा जन धन बँक खाते पासबुक, मोबाइल नंबर आवश्यक असेल. याशिवाय संमतीपत्र द्यावे लागेल जे कामगाराचे बँक खाते असलेल्या बँकेच्या शाखेतही द्यावे लागेल, जेणेकरून वेळेत पेन्शनसाठी त्याच्या बँक खात्यातून पैसे कापता येतील.

First published:
top videos

    Tags: Central government, Pm modi