50 हजार रुपयांमध्ये सुरू करा 'हा' व्यवसाय, महिन्याला कमवाल 30 हजार रुपये

50 हजार रुपयांमध्ये सुरू करा 'हा' व्यवसाय, महिन्याला कमवाल 30 हजार रुपये

यासाठी सरकारकडून तुम्हाला 90 टक्के कर्ज आणि 25 टक्के सबसिडी मिळते.

  • Share this:

मुंबई, 12 एप्रिल : देशात योग आणि आयुर्वेद यांचं महत्त्व लोकांना समजलंय. आयुर्वेदिक उत्पादनांमध्ये औषधांची मागणी वाढलीय. जवळजवळ सगळ्या आयुर्वेदिक कंपन्या ही औषधं, गोळ्या, गुटिका बनवून विकतात. अनेक आजारात ही औषधं प्रभावी ठरतात. जर तुमच्याकडे 50 हजार रुपये असतील, तर तुम्ही औषधं बनवण्याचं युनिट सुरू करू शकता. यासाठी सरकारकडून तुम्हाला 90 टक्के कर्ज आणि 25 टक्के सबसिडी मिळते.

90 टक्के मिळणार कर्ज - खादी व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशन ( KVIC )च्या सॅंपल प्राॅजेक्ट प्रोफाइलमध्ये आयुर्वेदिक औषधं बनवणाऱ्या प्रोजेक्टचा समावेश केला गेलाय. या प्रोजेक्टची किंमत 50 हजार रुपये आहे. बाकी 90 टक्के तुम्हाला सरकारकडून कर्ज मिळेल.

किती होणार खर्च? - या प्रोजेक्टची किंमत जवळजवळ 5.06 लाख रुपये आहे. त्यात मशिनरी, वापरण्यात येणारी मुद्दल, वर्कशाॅपचं भाडं यांचा समावेश आहे. यात तुम्ही वर्षभरात 20 हजार रुपयांची औषधं तयार कराल.

प्रोजेक्ट रिपोर्ट - KVICच्या रिपोर्टनुसार यात बिल्डिंगचं भाडं वर्षाला 2 लाख रुपये, मशिनरीवर 2.10 लाख रुपये, वर्किंग कॅपिटलसाठी 96 हजार रुपये, कच्चा माल 3.35 लाख रुपये, लेबल पॅकेजिंग 25 हजार रुपये, पगार 4.25 लाख रुपये, अॅडमिन खर्च 1.50 लाख रुपये, कर्जावरचं व्याज 66 हजार रुपये असा सर्व खर्च मिळून एकूण 4.18 लाखांची गरज लागेल.

कसा असेल प्रोजेक्ट - तुम्ही वर्षाला 20 हजार रुपये औषधांच्या गोळ्या बनवण्याचं लक्ष्य ठेवलं  तर वर्षाला 15 लाख रुपये विक्री होईल. म्हणजे 3.45 लाख रुपये नफा होऊ शकतो. महिन्याला 30 हजार रुपये कमाई होऊ शकते, असा प्रोजेक्ट रिपोर्ट सांगतो.

सरकार देईल ट्रेनिंग - सरकार या योजनेअंतर्गत ट्रेनिंग देणार आहे. यात मॅनेजमेंटही शिकवली जाईल.

कसा कराल अर्ज? - तुम्ही आॅनलाइन अर्ज करू शकता किंवा खादी व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशनच्या जिल्हा कार्यालयात संपर्क करू शकता. आॅनलाइनसाठी https://www.kviconline.gov.in/pmegpeportal/jsp/pmegponline.jsp इथे अर्ज करा.

VIDEO: काँग्रेसला हटवा तेव्हाच देशाचा विकास शक्य; मोदींचं UNCUT भाषण

First published: April 12, 2019, 1:16 PM IST
Tags: bussiness

ताज्या बातम्या