इन्कम टॅक्स रिटर्न भरताना चुका केल्यात तर पोचाल तुरुंगात, 'अशी' घ्या काळजी

इन्कम टॅक्स रिटर्न भरताना चुका केल्यात तर पोचाल तुरुंगात, 'अशी' घ्या काळजी

इन्कम टॅक्स रिटर्न भरायची प्रक्रिया सुरू झालीय. रिटर्न भरताना अशी घ्या काळजी

  • Share this:

मुंबई, 11 मे :  इन्कम टॅक्स रिटर्न भरायची प्रक्रिया सुरू झालीय. सरकारनं 2018-19साठी ITR फाॅर्म आणलेत. इन्कम टॅक्स फाॅर्म तुम्ही 31 जुलै 2019पर्यंत भरायचेत. तुम्ही काळजी घेतली नाहीत तर सरळ तुरुंगातच पोचाल. काय काळजी घ्यायची त्यासाठीच काही टिप्स.

शेवटच्या तारखेपर्यंत थांबू नका - वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला रिटर्न भरावेच लागतील. नाही तर तुम्हाला 10 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.

पुण्यात उच्चशिक्षित तरुणाने मुख्यमंत्र्यांकडे मागितली इच्छामरणाची परवानगी

बँक अकाउंटची माहिती योग्य द्या - IFSC कोड, बँकेचं नाव, बँक खातं ही सगळी माहिती नीट दिलीत तर रिफंड लगेच मिळू शकतो.

फाॅर्म16चा वापर - आयटीआर 1 फार्म भरण्यासाठी सॅलरी ब्रेकअप गरजेचं आहे. सर्व माहिती फाॅर्म 16वर असतेच. म्हणून फाॅर्म 16 असणं गरजेचं आहे.

नखं उपटली, पाय तोडले... दलिताच्या कोठडीतल्या मृत्यूप्रकरणी CBI चौकशीची मागणी

फाॅर्म 26ASचंही उपलब्ध - फाॅर्म 26AS रिटर्न फाइल करायला मदत होऊ शकते. यात सर्व करांचा समावेश असतो. त्यात पगार, व्याज इत्यादी गोष्टी असतात. तुम्ही फाॅर्म 16मध्ये दाखवलेल्या टीडीएसला 26 एएसच्या रूपात दाखवू शकतात. याशिवाय हा फाॅर्म तुम्हाला इतर मिळकतीची माहिती उपलब्ध करून  देतो.

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ.. शासकीय वसतिगृहाच्या जेवणात आढळली मेलेली पाल

रिटर्न मिळण्यासाठी योग्य दावा - तुम्ही कलम 80Cप्रमाणे करात सवलत मिळवली असेल तर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचे पुरावे द्यावे लागतील. जर तुम्हाला तुमच्या कंपनीनं मिळणाऱ्या ट्रॅव्हल आणि मेडिकल अलाउन्समध्ये सवलत नसेल दिली तर तुम्ही त्याबद्दल दावा करू शकत नाही.

योग्य फाॅर्म निवडा - नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी वेगवेगळे फाॅर्म असतात. तुम्ही तशीच निवड करा.

काहीही लपवू नका - तुमच्या मिळकतीच्या सर्व स्रोतांची माहिती द्या. काहीही लपवू नका. तुम्ही तुमचं घर विकलंत तरी त्याबद्दल फाॅर्ममध्ये भरावं लागेल.

SPECIAL REPORT: 'मोदी काले हैं तो क्या हुआ, दिल वाले हैं

First published: May 11, 2019, 8:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading