Home /News /money /

कोणत्याही मोठ्या डिग्रीशिवाय 'ही' कंपनी देत आहे 30 हजार लोकांना नोकरी!

कोणत्याही मोठ्या डिग्रीशिवाय 'ही' कंपनी देत आहे 30 हजार लोकांना नोकरी!

सणासुदीच्या काळात ई-कॉमर्स कंपन्यांची वाढती मागणी लक्षात घेता नवीन लोकांची भर्ती ही कंपनी करत आहे.

    नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : सामानाच्य डिलिव्हरीसह ‘लॉजिस्टिक’ सुविधा देणारी ईकॉम एक्स्प्रेस (Ecom Express) ही कंपनी पुढच्या काही आठवड्यात 30 हजार लोकांना नोकरी देणार आहे. या नोकऱ्या तात्पुरत्या असतील. सणासुदीच्या काळात ई-कॉमर्स कंपन्यांची वाढती मागणी लक्षात घेता नवीन लोकांची भर्ती ही कंपनी करत आहे. कोव्हिड-19 आधी या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या 23 हजार होती. लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यानंतर ऑनलाइन ऑर्डर पूर्ण करण्यासाठी या कंपनीने गेल्या काही महिन्यांत 7,500 कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. लॉकडाऊनमुळे किराणा, औषध आणि इतर वस्तूंसाठी लोक ई-कॉमर्सकडे वळले आहेत. ईकॉम एक्स्प्रेसचे उपाध्यक्ष सौरभ दीप सिंगला यांनी पीटीआयला सांगितले की, कोरोनाने ई-कॉमर्स उद्योगाला वेगळ्या टप्प्यावर नेले आहे. सणासुदीच्या दिवसात ई-कॉमर्स ग्राहक बर्‍याच गोष्टी खरेदी करण्याच्या तयारीत असतात. त्यामुळे त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी जास्त माणसांची गरज आहे. वाचा-स्वस्त किंमतीत खरेदी करा प्रॉपर्टी, 29 सप्टेंबरपर्यंत ही बँक देतेय संधी 30 हजार तात्पूरच्या नोकऱ्या देणार ही प्रक्रिया 10 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे यातून 30 हजार लोकांना तात्पुरता रोजगार देण्यात येणार आहे. सिंगला यांनी सांगितले की, ऑगस्टमध्ये कंपनीत 30 हजार 500 कर्मचारी होते. मागील वर्षीही 20 हजार लोकांना तात्पूरता रोजगार दिला होता. जरी या नोकर्‍या तात्पुरत्या असल्या तरी जवळजवळ एक तृतीयांश लोकांना नंतर कायमस्वरूपी नोकरी दिली जाते. वाचा-नवीन नियमांनंतर Mutual Fund मध्ये गुंतवलेल्या तुमच्या पैशांवर काय परिणाम होणार? ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये भर्तीची संधी येत्या काही महिन्यात ई-कॉमर्स कंपन्यांच्या व्यवसायात तेजी पाहायला मिळू शकते. त्यामुळे वितरण क्षमता वाढविण्यासाठी वॉलमार्टच्या मालकीच्या फ्लिपकार्टने अलीकडेच 50 हजारहून अधिक किराणा दुकानं जोडली आहेत. तर, अॅमेझॉन इंडियाने पाच केंद्रे (विशाखापट्टणम, फरुखनगर, मुंबई, बेंगळुरू आणि अहमदाबाद) समाविष्ट करण्याची घोषणा केली. तसेच विद्यमान आठ केंद्रांच्या विस्ताराची घोषणा केली आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या