Amazonचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल; 1 लाखहून अधिक दुकानदारांना मिळणार कामाची संधी

Amazonचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल; 1 लाखहून अधिक दुकानदारांना मिळणार कामाची संधी

Amazon फेस्टिव्ह सीजनमध्ये ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरु करणार आहे. या सेलद्वारे देशभरातील एक लाखहून अधिक छोटी-मोठी दुकानं आणि किराणा स्टोर जोडली जाणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर : ई-कॉमर्स कंपनी अमेझॉन Amazon फेस्टिव्ह सीजनमध्ये ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल Great Indian Festival Sale सुरु करणार आहे. या सेलद्वारे देशभरातील एक लाखहून अधिक छोटी-मोठी दुकानं आणि किराणा स्टोर जोडली जाणार आहेत. अमेझॉन इंडियाने Amazon India दिलेल्या माहितीनुसार, या दुकानांना वेग-वेगळ्या कँपेनअंतर्गत जोडलं जाणार आहे. ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये 20 हजारहून अधिक ऑफलाईन रिटेलर, किराणा आणि स्थानिक दुकानदार Shopkeepers भाग घेतील. हे दररोज लागणार सामान, मोठी उपकरणं आणि घराच्या सजावटीसाठी लागणाऱ्या सामानाची विक्री करणार आहेत.

अमेझॉनने दिलेल्या माहितीनुसार, या सेलमध्ये सामील झालेले दुकानदार डिजिटल माध्यमातून ग्राहकांपर्यंत आपली पोहोच वाढवू शकतील. तसंच ग्राहकांना आपल्याच शहरातील स्टोरमधून खरेदी करण्याची सुविधा मिळेल. ई-कॉमर्स कंपनीने छोट्या-मोठ्या दुकानदारांना या प्लॅटफॉर्मशी जोडण्याचं काम लॉकडाऊनदरम्यान एप्रिल 2020 मध्ये सुरु केलं होतं. आतापर्यंत 400 शहरांतील 20000 हून अधिक रिटेलर्स या प्लॅटफॉर्मशी जोडले गेले आहेत. यात मेरठ, लुधियाना, सहारनपूर, इंदौर, एर्नाकुलम, सूरत, कांचीपूरम यासारख्या शहरातील दुकानदार सामिल आहेत.

हे वाचा - आता PF Account मधून तुम्ही काढू शकता Advance रक्कम, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

अमेझॉन इंडियाने, अमेझॉन ईजी स्टोर्स, आय हॅव स्पेस आणि अमेझॉन पे स्मार्ट स्टोर नावानेही कार्यक्रम सुरु केला आहे. अमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष मनीष तिवारी यांनी सांगितलं की, या फेस्टिव्ह सीजनमध्ये आम्ही आमच्या विक्रेत्यांना आणि इतर एमएसएमई भागीदारांना व्यवसाय वाढवण्यात मदत करण्यासाठी तसंच सध्याच्या कठीण काळातील आव्हानांवर विजय मिळवण्यासाठी भर देत आहोत.

काही दिवसांपूर्वी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टनेही फेस्टिव्ह सीजनपूर्वी आपली डिलिव्हरी क्षमता मजबूत करण्यासाठी 50 हजार किराणा दुकानांना आपल्या प्लॅटफॉर्मशी जोडलं आहे.

हे वाचा - JEE Advanced Result 2020: असा चेक करा जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल

दरम्यान, अमेझॉन ग्रेट इंडियन सेलची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. दरवर्षी दसरा आणि दिवाळीपूर्वी ई-कॉमर्स कंपन्या मोठा व्यवसाय करतात. एका रिपोर्टनुसार, यावर्षी फेस्टिव्ह सेलमध्ये विक्री दुप्पट होऊ शकते.

Published by: Karishma Bhurke
First published: October 5, 2020, 1:56 PM IST
Tags:

ताज्या बातम्या