ई सिगरेट पिणाऱ्यांनो सावधान, इतकी वर्षं जावं लागेल तुरुंगात

ई सिगरेट पिणाऱ्यांनो सावधान, इतकी वर्षं जावं लागेल तुरुंगात

एका संशोधनानुसार ई सिगरटेचं सेवन केल्याने नैराश्य येण्याची शक्यता दुप्पट होते. जे लोक ही सिगरेट पितात त्यांच्यामध्ये हार्ट अ‍ॅटॅकचा धोका 56 टक्के वाढतो. त्याचबरोबर ई सिगरटेचं दीर्घ काळ सेवन केलं तर रक्त गोठण्याचाही धोका असतो.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : वाणिज्य मंत्रालयाने ई सिगरेट, ई हुक्का आणि यासारख्या उत्पादनांच्या खरेदी विक्रीवर बंदी घातलीय. या नियमाचं उल्लंघन केलं तर 5 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.इलेक्ट्रॉनिक सिगरेटचं उत्पादन, आयात, निर्यात, विक्री, खरेदी, साठा, जाहिरात या सगळ्यावरच बंदी घालण्यात आली आहे. सरकारने याबद्दल गेल्याच आठवड्यात अध्यादेश जारी केला होता. या अध्यादेशानुसार, ई सिगरटेच्या गुन्ह्यामध्ये पहिल्या वर्षी तुरुंगवास आणि एक लाख रुपयांचा दंड आहे. त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी 3 वर्षांचा तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांचा दंड आहे. त्याचबरोबर ई सिगरेटचा साठा केला तर 6 महिन्यांचा तुरुंगवास आणि 50 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.

ई-सिगरेटमुळे होतं हे नुकसान

एका संशोधनानुसार ई सिगरटेचं सेवन केल्याने नैराश्य येण्याची शक्यता दुप्पट होते. जे लोक ही सिगरेट पितात त्यांच्यामध्ये हार्ट अ‍ॅटॅकचा धोका 56 टक्के वाढतो. त्याचबरोबर ई सिगरटेचं दीर्घ काळ सेवन केलं तर रक्त गोठण्याचाही धोका असतो.

(हेही वाचा : भारताच्या अर्थव्यवस्थेला आणखी एक धक्का, 8 क्षेत्रांतल्या उद्योगांची मोठी घसरण)

ई सिगरेटमध्ये निकोटिन आणि अन्य रसायनयुक्त पदार्थ भरले जातात. हा एक प्रकारचा इनहेलर असतो. त्यामुळे ई सिगरेटचं सेवन करणाऱ्या व्यक्तीला सिगरेट प्यायल्याचा अनुभव घेता येतो.

बऱ्याच वेळा ई सिगरेटमध्ये निकोटिन असतं किंवा आणखीही काही प्रकारची घातक रसायनं असतात. काही कंपन्यांच्या ई सिगरेटमधल्या रसायनांमुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो. त्यामुळेच ई सिगरेटवर बंदी घालण्य़ात आली आहे.

=========================================================================================

VIDEO : मी ब्ल्यू फिल्म करत नाही, राज ठाकरेंची टोलेबाजी

Published by: Arti Kulkarni
First published: September 30, 2019, 7:46 PM IST
Tags: money

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading