Home /News /money /

शेअर बाजारातील घसरगुंडीतही छोट्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना सावरलं; 44 टक्क्यांपर्यंत रिटर्न

शेअर बाजारातील घसरगुंडीतही छोट्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना सावरलं; 44 टक्क्यांपर्यंत रिटर्न

गेल्या आठवड्यात सोमवार वगळता शुक्रवारपर्यंतच्या चार दिवसांत BSE सेन्सेक्स 3.57 टक्क्यांनी घसरला आणि NSE निफ्टी50 3.49 टक्क्यांनी घसरला. बीएसई मिडकॅप (BSE Midcap) 4.3 टक्के आणि स्मॉलकॅप 3 टक्क्यांनी घसरला.

    मुंबई, 22 जानेवारी : शेअर बाजारातील मागील आठवडा गुतंवणूकदारांसाठी निराशाजनक आणि मोठा नुकसाने देणारा ठरला आहे. मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सने गुंतवणूकदारांचे लाखो कोटींचं नुकसाना केलं. तर स्मॉल कॅपच्या (Small Cap Share) शेअर्सने बंपर कमाई केली आणि 44 टक्क्यांपर्यंत परतावा दिला. गेल्या आठवड्यात सोमवार वगळता शुक्रवारपर्यंतच्या चार दिवसांत BSE सेन्सेक्स 3.57 टक्क्यांनी घसरला आणि NSE निफ्टी50 3.49 टक्क्यांनी घसरला. बीएसई मिडकॅप (BSE Midcap) 4.3 टक्के आणि स्मॉलकॅप 3 टक्क्यांनी घसरला. असे असूनही, सुमारे 33 स्मॉलकॅप शेअर्सनी 10 ते 44 टक्क्यांपर्यंत बंपर परतावा दिला आहे. मात्र, Sterlite Technologies, Tata Teleservices (Maharashtra) ltd, Urja Global, Hikal, Tejas Networks सारख्या 30 हून अधिक स्मॉल कॅप शेअर्समुळे गुंतवणूकदारांचं 10 ते 23 टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. बेरोजगार, गरीबांसाठी केंद्र सरकार योजना आणण्याच्या तयारीत; थेट खात्यात येतील पैसे या छोट्या शेअर्समुळे गुंतवणूकदारांची कमाई प्रिसिजन वायर्स इंडियाच्या शेअर्सने (Precision Wires India) 14 ते 21 जानेवारी दरम्यान सर्वाधिक 44.38 टक्के परतावा दिला आहे. त्यापाठोपाठ HSIL 36.30 टक्के, खेतान केमिकल्स (Khetan Chemicals) 35.26 टक्के, Kelton Tech Solutions 31.07 टक्के, Onmobile Global 27.59 टक्के, Vikas Lifecare 21.49 टक्के, Dhanvarsha Finvest 19.13 टक्के, SIS 17.65 टक्के, Pennar Industries 16.18 टक्के, Bharat Road Network 15.19 टक्के and Tinplate Company of India 15.11 टक्के मजबूत परतावा दिला आहे. शेअर बाजारात घसरणीदरम्यान 'या' IT स्टॉकमध्ये तेजी, काय आहे कारण? तज्ज्ञांचं मत काय? BSE-NSE च्या या सेक्टर्सना मोठा धक्का गेल्या एका आठवड्यात बीएसई आयटी निर्देशांकात (IT Index) 6.5 टक्क्यांची मोठी घसरण झाली. याशिवाय टेलिकॉम निर्देशांक (Telecom Index) 5.8 टक्क्यांवर बंद झाला. निफ्टीच्या फार्मा इंडेक्समध्येही (Pharma Index) 5.2 टक्क्यांची मोठी घसरण झाली आहे. गुंतवणूकदारांनी आयटी क्षेत्रात सर्वाधिक प्रॉफिट बुकींग केली.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या