Home /News /money /

कोरोनाचा फटका! 'बेस्ट करिअर ऑप्शन' म्हणून पाहिलं जाणाऱ्या क्षेत्रामध्ये नोकऱ्यांचं संकट

कोरोनाचा फटका! 'बेस्ट करिअर ऑप्शन' म्हणून पाहिलं जाणाऱ्या क्षेत्रामध्ये नोकऱ्यांचं संकट

कोरोनामुळे (Coronavirus) देशभरात अनेक क्षेत्र अशी आहेत की ज्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. विमानचालन क्षेत्राचे झालेले नुकसान तर अगणित आहे.

    रोहन सिंह, नवी दिल्ली, 25 जुलै : कोरोनामुळे (Coronavirus) देशभरात अनेक क्षेत्र अशी आहेत की ज्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. विमानचालन क्षेत्राचे झालेले नुकसान तर अगणित आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी एअर इंडियाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना दीर्घकाळासाठी बिनपगारी रजेवर पाठवले आहे, अनेकांना तर कामावरून कमी केले आहे. काही वैमानिकानी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या भत्त्यामध्ये 85 टक्के कपात केली आहे. ज्या वैमानिकांना दीर्घकालीन अनुभव आहे, ते देखील सध्या भविष्याच्या चिंतेत आहेत. इंडिगोने (indigo) देखील त्यांच्या 10% कर्मचाऱ्यांमध्ये कपात केली आहे.यामध्ये एअर हॉस्टेस, केबिन क्रु आणि ग्राउंड हँडलिंग स्टाफचा समावेश आहे. सध्याच्या काळात संपूर्ण विमानचालन क्षेत्र (Aviation Sector) संकटातून जात आहे आणि त्यातील कर्मचाऱ्यांना लवकर नोकरी मिळण्याची शक्यता देखील धूसर आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाण देखील अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे सर एअरलाइन्स त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करत आहेत. (हे वाचा- नावात सर्वकाही आहे! CORONA नावामुळे या उद्योगामध्ये आल्या अनेक समस्या) या सर्वाचा परिणाम ज्या विद्यार्थ्यांना Aviation क्षेत्रामध्ये करिअर करायचे आहे, त्यांच्यावरही झाला आहे. सध्याची वेळ ही प्रशिक्षण कोर्ससाठी अर्ज करण्याची आहे, परंतु यावेळी विद्यार्थी फॉर्म भरण्यास घाबरत आहे. देशातील सर्वात मोठी क्रू प्रशिक्षण संस्था फ्रँकफिन इन्स्टिट्यूट ऑफ एअर हॉस्टेस ट्रेनिंगचे सेल्स अँड ऑपरेशन्सचे संचालक अंशुल गौबा म्हणतात, "कोरोनामुळे संपूर्ण विमानचालन उद्योगामध्ये मोठा फरक पडला आहे, यात काही शंका नाही. विमानचालन क्षेत्राशी निगडीत प्रशिक्षणावरही याचा फरक पडला आहे.  फ्रँकफिनमध्ये प्रवेशाची संख्या मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे". (हे वाचा-या बँकेच्या ग्राहकांसाठी खूशखबर! WhatsApp वर 24 तास सेवा उपलब्ध) विमानचालन क्षेत्रासाठी लागणारे प्रशिक्षण केवळ दिल्ली मुंबईसारख्या मोठ्या शहरातच नव्हे तर देशातील छोट्या शहरांमध्येही मिळावे याकरता अनेक संस्था उघडण्यात आल्या आहेत. परंतु यावर्षी त्यांना टिकवून ठेवणे अवघड होत आहे. गुवाहाटीच्या केबिन क्रू ट्रेनर संगीता पठानिया सांगतात - विद्यार्थी बारावीचा निकाल लागल्यानंतर या संस्थांमध्ये प्रवेश घेण्याची तयारी करतात. पण यावेळी विद्यार्थ्यांमध्ये अनिश्चिता आहे.  विद्यार्थ्यांना क्लासरुम ट्रेनिंग देणे अवघड आहे.  इंडिगो आणि एअर इंडियाशी संबंधित बातम्यांमुळेही विद्यार्थ्यांचे मनोबल कमी होत आहे. वैमानिक प्रशिक्षणातील अनेक अभ्यासक्रम तर टाळण्यात येत आहेत. देशभरात असणाऱ्या विविध केबिन क्रू संस्थांसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत 30% घट झाली आहे. प्रख्यात केबिन क्रू ट्रेनर सवि भल्ला म्हणतात - ज्या विद्यार्थ्याला विमानचालनात रस होता त्याला यामध्ये भवितव्य आहे की नाही, यावरून आता भीती वाटत आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Career

    पुढील बातम्या