नवी दिल्ली, 15 जानेवारी: केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) ने बुधवारी ट्वीट करून अशी माहिती दिली आहे की, 1 एप्रिल 2020 पासून 11 जानेवारी 2021 दरम्यान 1.57 कोटी टॅक्सपेयर्सना 1,73,139 कोटी (Income Tax Refund) रुपयांचा रिफंड जारी करण्यात आला आहे. 1,54,55,577 प्रकरणात 57,139 कोटी रुपयांचा रिफंड जारी करण्यात आला आहे. तर 2,10,150 प्रकरणात 1,15,999 रुपयाचा कॉर्पोरेट टॅक्स (Corporate Tax) जारी करण्यात आला आहे. मात्र सोशल मीडियावर अनेकांनी असे म्हटले आहे की, आयटीआर फाइल करूनही 4 ते 5 महिन्यात रिफंड नाही मिळाला नाही.
डिसेंबरमध्ये काही माध्यमांमध्ये असे म्हटले होते की करदात्यांना आयटीआर भरल्याच्या एका आठवड्यात परतावा मिळतो. प्राप्तिकर परताव्याची प्रक्रिया पूर्वीपेक्षा वेगवान होत आहे.
(हे वाचा- 'पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळल्यास देशाला होईल 1 लाख कोटींचा फायदा')
काही चार्टर्ड अकाउंटंट्सचे असे म्हणणे आहे की, काही प्रकरणात करदात्यांना लवकरच रिफंड मिळतो आहे. याआधी असे पाहायला मिळत नव्हते. ITR-1 आणि ITR-4 च्या प्रकरणात असे होत आहे. आयकर विभागाने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर एक नवीन तंत्रज्ञान CPC 2.0 चा वापर करण्यास सुरुवात केली आहे. शिवाय ‘‘झटपट प्रोसेसिंग’’ या नावानेे आयकर विभागाने एक नवा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत ITR-1 आणि ITR-4 ची प्रोसेसिंग सुरू झाली आहे.
अशावेळी जाणून घ्या जर तुम्हाला रिफंड मिळाला नाही आहे तर त्याची कारणं काय असू शकतात
बँक खात्यबाबत चुकीची माहितीः कर विभागाने सुरू केलेल्या नवीन प्रक्रियेअंतर्गत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आयकर परतावा दिला जात आहे. म्हणजेच परतावा रक्कम थेट करदात्याच्या बँक खात्यात पाठविली जात आहे. अशा परिस्थितीत फॉर्ममध्ये असलेल्या बँक खात्याशी संबंधित माहिती चुकीची असल्यास परतावा मिळण्यास विलंब होऊ शकतो. ते दुरुस्त करेपर्यंत परतावा उपलब्ध होणार नाही. आयकर पोर्टलवर जाऊन बँक खात्याची माहिती दुरुस्त केली जाऊ शकते. याशिवाय तुमचे बँक खाते आपल्या पॅनशी जोडले असणे गरजेचे आहे.
(हे वाचा- OMG! छातीवर कान, हात ठेवण्याची नाही गरज; डोळ्यांनीच दिसतं मुलीचं धडधडतं हृदय)
बँक खाते व्हॅलिडेशन: रिफंड मिळविण्यासाठी, बँक खाते व्हॅलिडेट करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही प्राप्तिकर विभागाच्या वेबसाइटवर जाऊन पॅन आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करा. यानंतर तुम्हाला 'प्रीव्हॅलिडेट युअर बँक अकाउंट' हा पर्याय निवडा. जर तुमचे बँक खाते ई-फाईलिंग पोर्टलसह इंटीग्रेटेड केले असेल तर इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड म्हणजे ईव्हीसीद्वारे प्रीव्हॅलिडेशन थेट केले जाईल. तुम्हाला बँक खाते, आयएफएससी कोड, मोबाइल क्रमांक आणि ईमेल आयडी द्यावा लागेेल.
आयटीआर व्हेरिफाय नाही: तुम्ही आयटीआर व्हेरिफाय केल्यानंतरच आयकर विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. तसे न केल्यास, आयटीआर प्रक्रिया केली जाणार नाही आणि आपल्याला रिफंड मिळण्यास विलंब लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Income tax