DTE इंजिनिअरिंग डिप्लोमाची पहिली लिस्ट झाली जाहीर

DTE Maharashtra Seat Allotment Round 1- DTE इंजिनिअरिंग डिप्लोमाची पहिली लिस्ट झाली जाहीर झाली आहे. या लिंकवर तुम्ही चेक करू शकता

News18 Lokmat | Updated On: Jul 16, 2019 09:05 PM IST

DTE  इंजिनिअरिंग डिप्लोमाची पहिली लिस्ट झाली जाहीर

मुंबई, 16 जुलै : DTE महाराष्ट्रनं इंजिनियरिंग, टेक्नाॅलाॅजीमधल्या SSC डिप्लोमा कोर्सच्या प्रवेशाची पहिली मेरिट लिस्ट प्रसिद्ध केलीय. 2018-19साठीचा हा अभ्यासक्रम आहे. ही यादी त्यांची ऑफिशियल वेबसाइट  www.poly19.dtemaharashtra.org वर प्रसिद्ध झालीय. राउंड 1 सीएपी किंवा सामान्य प्रवेश प्रक्रियेची तपासणी करण्यासाठी उमेदवारांना याचा उपयोग होईल.

ज्या उमेदवारांना CAP राउंड 1 प्रमाणे सीट दिली जाईल, त्यांनी 17 आणि 19 जुलै 2019च्या मध्ये रिपोर्टिंग केंद्रावर किंवा ARCsवर रिपोर्ट करणं आवश्यक आहे. इथे त्यांची कागदपत्र तपासली जातील. उमेदवारांनी हे ध्यानात ठेवावं की त्यांच्या पहिल्या चाॅइसनुसार CAP राउंड 1मध्ये सीट दिली गेली असेल तर ते पुन्हा दुसऱ्या राउंडमध्ये भाग घेऊ शकत नाही. त्यांचा अर्ज ऑटो फ्रीज होतो. इतर उमेदवारांना सीट्स दिल्यात, पण त्यांच्या पहिल्या चाॅइसप्रमाणे दिल्या नसतील तर त्यांनी आपल्या लाॅगइननं अर्ज सेल्फ फ्रीज करायला हवा.

पुन्हा एकदा सोनं महागलं, 'हे' आहेत आजचे दर

उमेदवारांनी ARCs वर आपल्या ओरिजनल कागदपत्रांबरोबर झेराॅक्स काॅपी, अॅप्लिकेशन फाॅर्म, SSC परीक्षेची मूळ मार्कलिस्ट आणि कॅटेगरी सर्टिफिकेट आणावं. व्हेरिफिकेशन प्रक्रियेच्या वेळी अधिकारी झेराॅक्स काॅपी तपासून त्यावर स्टँप आणि सही करतील आणि ओरिजनल कागदपत्र उमेदवाराला परत करतील.

नोकरी मिळणं होईल सोपं, सरकार देणार नव्या जमान्याचं ट्रेनिंग

Loading...

पेट्रोल-डिझेलच्या किमतीत तीन दिवसांनी मिळाला दिलासा, 'हे' आहेत नवे दर

ही यादी त्यांची ऑफिशियल वेबसाइट  www.poly19.dtemaharashtra.org वर प्रसिद्ध झालीय. राउंड 1 सीएपी किंवा सामान्य प्रवेश प्रक्रियेची तपासणी करण्यासाठी उमेदवारांना याचा उपयोग होईल.

उमेदवारांनी आता सर्व कागदपत्र तयार ठेवून पुढच्या कामासाठी तयार राहावं.

SPECIAL REPORT : मुंबईतील सर्वात श्रीमंत आमदाराने घेतली आशिष शेलारांची जागा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 16, 2019 09:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...