• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • बापरे! DRI ने जप्त केलं 42 कोटींचं सोनं, एअर कार्गोद्वारे हाँगकाँगमधून भारतात केली जात होती Gold ची तस्करी

बापरे! DRI ने जप्त केलं 42 कोटींचं सोनं, एअर कार्गोद्वारे हाँगकाँगमधून भारतात केली जात होती Gold ची तस्करी

डीआरआयने भारतात हाँगकाँगमधून तस्करी होणारे जवळपास 42 कोटी किमतीचं सोनं जप्त केलं आहे. केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (Directorate of Revenue Intelligence) वतीने मोल्टन मेटल ही सोन्याच्या तस्करांना पकडण्यासाठीची गुप्तचर मोहीम राबवण्यात आली.

 • Share this:
  नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर: डीआरआयने भारतात हाँगकाँगमधून तस्करी होणारे जवळपास 42 कोटी किमतीचं सोनं जप्त (DRI Seized Gold) केलं आहे. केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (Directorate of Revenue Intelligence) वतीने मोल्टन मेटल ही सोन्याच्या तस्करांना पकडण्यासाठीची गुप्तचर मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत डीआरआयच्या पथकाने चिनी नागरिकांसह चार परदेशी नागरिकांकडून सुमारे 85.535 किलो सोने जप्त केले आहे. ज्याची किंमत अंदाजे 42 कोटी रुपये आहे. हाँगकाँगमधून एअर कार्गोमधून या सोन्याची तस्करी केली जात होती. तस्करांनी मोठ्या शिताफीने सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना पकडण्यात डीआरआयला यश आलं. त्यांनी सोनं ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरण्यासाठी ईआय प्लेट्सच्या स्वरूपात मागवलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या परदेशी नागरिकांमध्ये साउथ कोरियाचे दोन जण तर चीन तसंच तैवानमधून एक-एक जण आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात माल येणार होता. त्यांनी छतरपूरमध्ये एक फार्म हाऊस देखील भाड्याने घेतले होते. अशी माहिती मिळते आहे की ते हे सोने वितवणून त्याला सिलेंडरचे स्वरुप देत असत. या प्रकरणात दिल्लीच्या एका सराफाचा देखील हात असल्याची टीप डीआरआयला मिळाली होती, त्याच्यातडून डीआरआयने एकूण 5409 किलो सोनं जप्त केलं आहे. दरम्यान पकडण्यात आलेल्या चार परदेशी नागरिकांपैकी दोघजण याआधी देखील सोनं तस्करीसाठी दोन वेळा जेलची हवा खाऊन आले आहेत. हे वाचा-NPS vs APY: नॅशनल पेन्शन योजना की अटल पेन्शन योजना? कोणती योजना आहे फायदेशीर? अशाप्रकारे तस्करी होत असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, चिनी, तैवानी आणि दक्षिण-कोरियन नागरिकांसह अनेक भारतीय आणि परदेशी नागरिक एअर कार्गो मार्गाचा वापर करून हाँगकाँगमधून भारतात सोन्याची तस्करी करत आहेत. मशिनरीतील सामान्य धातूच्या पार्ट्सऐवजी सोन्याचे भाग मागवले जात असल्याची माहिती समोर आली होती. हे वाचा-Cryptocurrency संदर्भात मोठी अपडेट, वाचा काय होणार भारतीय गुंतवणुकदारांवर परिणाम मिळालेल्या माहितीच्या आधारे डीआरआयने कारवाई केली आणि अधिकाऱ्यांची एक टीम तयार केली आणि आयजीआय विमानतळावरील एअर कार्गो कॉम्प्लेक्समध्ये आलेल्या मालाची तपासणी केली. तपासादरम्यान या मालामध्ये ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आलेली इलेक्ट्रोप्लेटिंग मशीन आढळून आली. त्याची तपासणी केली असता पॉलिश केलेले सोने आढळून आले. तपासात आयात केलेल्या 80 इलेक्ट्रोप्लेटिंग मशीनमधून प्रत्येकी 1 किलो सोने जप्त करण्यात आले. यासोबतच माहितीच्या आधारे एका पथकाने दिल्लीतील एका ज्वेलर्सवर छापा टाकून त्याच्याकडून तस्करीशी संबंधित 5409 किलो सोने जप्त केले.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: