Home /News /money /

Budget 2022: आता मोबाइलवर वाचता येणार देशाचं बजेट, डाउनलोड करावं लागेल सरकारचं हे App

Budget 2022: आता मोबाइलवर वाचता येणार देशाचं बजेट, डाउनलोड करावं लागेल सरकारचं हे App

अर्थसंकल्प सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने एक App (Read Budget 2022 on mobile App) तयार केलं आहे. युनियन बजेट मोबाइल अॅप असं त्याचं नाव असून, यावर तुम्हाला संसदेत अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर तो हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांत वाचता येणार आहे.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 28 जानेवारी: मोबाइलचा वापर दिवसेंदिवस वाढला असून तो आपल्या जीवनाचा अविभाज्य घटकच बनला आहे. आजच्या काळामध्ये मोबाईलशिवाय जगणं हे कठीणच झालं आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत जवळपास सर्वांच्या हातामध्ये मोबाइल पाहायला मिळतो. जगाच्या कानाकोपऱ्यात घडणारी एखादी घटना मोबाईलमुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये आपल्याला समजते. आता याच मोबाइलवर तुम्हाला संसदेत सादर होणारा अर्थसंकल्प (Union Budget 2022) सुद्धा वाचता येणार आहे. अर्थसंकल्प सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने एक App (Read Budget 2022 on mobile App) तयार केलं आहे. युनियन बजेट मोबाइल अॅप (Union Budget Mobile App) असं त्याचं नाव असून, यावर तुम्हाला संसदेत अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर तो हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांत वाचता येणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये म्हणजेच 1 फेब्रुवारी 2022 ला देशाचा वार्षिक अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) सादर करणार आहेत. त्या पूर्वीपासूनच अर्थसंकल्पाबाबतच्या बऱ्याच चर्चा सध्या पाहायला मिळत आहेत. शिवाय याबाबतची उत्सुकताही काही कमी नाही. त्यातच आता संसदेत सादर केल्या जाणाऱ्या या अर्थसंकल्पाची सॉफ्ट कॉपी सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या मोबाइलवर सहज उपलब्ध होणार आहे. त्यासाठी फक्त सरकारने लाँच केलेलं युनियन बजेट मोबाइल अॅप तुमच्या मोबाइलमध्ये असणं आवश्यक आहे. हे वाचा-LIC IPO बाबत सस्पेन्स संपला! केव्हा येणार हा मेगा आयपीओ? लवकरच आहे कमाईची संधी अर्थसंकल्प सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने हे अॅप सादर केलं आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2022 हा येत्या 1 फेब्रुवारी 22 ला सकाळी 11 वाजता सादर केला जाईल. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सर्वसामान्यांना तो त्यांच्या मोबाइलमधील युनियन बजेट मोबाइल अॅपवर हिंदी किंवा इंग्रजी भाषेत वाचता येणार आहे. या अॅपवर लोकांना बजेटशी संबंधित सर्व माहिती मिळेल. एफएमसीजी कंपन्यांना काय आहे अपेक्षा? वाढती महागाई आणि ग्रामीण भागात मंदावलेली मागणी यांच्याशी झगडत असणारी फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स (FMCG) कंपन्या वस्तूंची मागणी वाढण्यासोबतच अर्थव्यवस्थेला चालना मिळावी, यासाठी आगामी अर्थसंकल्पात केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी करत आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) अंतर्गत मोबदला वाढवणं, पगारदारांसाठी टॅक्स कमी करणं यासारख्या अनेक घोषणा अर्थसंकल्पात केल्या जातील, व ज्यामुळे व्यवसायाला मदत होईल, अशी अपेक्षा हिंदुस्थान युनिलिव्हर (HUL), पार्ले प्रॉडक्ट्स, इमामी आणि केविन केअर सारख्या कंपन्यांच्या उच्च अधिकाऱ्यांना आहे. हे वाचा-Gold Price Today: कालच्या घसरणीनंतर आज पुन्हा महागलं सोनं-चांदी,पाहा लेटेस्ट रेट कोरोना महामारीचा विविध क्षेत्रांना फटका बसला असून, त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर सुद्धा झाला आहे. त्यामुळे आता अर्थसंकल्प 2022 मध्ये कोणकोणत्या घोषणा केल्या जातात, याकडे सर्वसामान्य नागरिकांचेही लक्ष लागले आहे.
First published:

Tags: Budget, Union budget

पुढील बातम्या