मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Share market Update : शेअर बाजारात घसरणीचा कल; गुंतवणूकीसाठी चांगली संधी

Share market Update : शेअर बाजारात घसरणीचा कल; गुंतवणूकीसाठी चांगली संधी

गेल्या काही दिवसात मात्र शेअर बाजारातील तेजीला ग्रहण लागले आहे. आज तर शेअर बाजार जोरदार कोसळला आहे. सेन्सेक्स प्रथमच 59 हजारांच्या खाली गेला आहे, तर निफ्टीही 17 हजारांवर पोहोचला आहे. शेअर बाजारातील या घसरणीच्या कारणांबाबत सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

गेल्या काही दिवसात मात्र शेअर बाजारातील तेजीला ग्रहण लागले आहे. आज तर शेअर बाजार जोरदार कोसळला आहे. सेन्सेक्स प्रथमच 59 हजारांच्या खाली गेला आहे, तर निफ्टीही 17 हजारांवर पोहोचला आहे. शेअर बाजारातील या घसरणीच्या कारणांबाबत सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

गेल्या काही दिवसात मात्र शेअर बाजारातील तेजीला ग्रहण लागले आहे. आज तर शेअर बाजार जोरदार कोसळला आहे. सेन्सेक्स प्रथमच 59 हजारांच्या खाली गेला आहे, तर निफ्टीही 17 हजारांवर पोहोचला आहे. शेअर बाजारातील या घसरणीच्या कारणांबाबत सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 22 नोव्हेंबर : भारतीय शेअर बाजाराच्या (Indian Share Market) दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी (Index) दिवाळीच्या सुमारास उच्चांकी पातळी गाठत नवनवे विक्रम नोंदवले होते. मुंबई शेअर बाजाराचा (Mumbai Share Market -BSE) निर्देशांक सेन्सेक्सनं 62 हजाराचा टप्पा पार केला होता. शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 18 हजारांच्या पुढं गेला होता. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांना चांगली कमाई झाली होती. गेल्या काही दिवसात मात्र शेअर बाजारातील तेजीला ग्रहण लागले आहे. आज तर शेअर बाजार जोरदार कोसळला आहे. सेन्सेक्स प्रथमच 59 हजारांच्या खाली गेला आहे, तर निफ्टीही 17 हजारांवर पोहोचला आहे. शेअर बाजारातील या घसरणीच्या कारणांबाबत सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

टीव्ही9 ने दिलेल्या वृत्तानुसार, आठवड्याच्या पहिल्या दिवशी आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मंदावली होती. पण देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजबाबतच्या (Reliance Industries) नकारात्मक बातम्यांनी बाजारावर दबाव वाढला आणि घसरणीला चालना मिळाली. रिलायन्स-अरामको करार (Reliance -Aramaco) रद्द झाल्याच्या आणि अमेरिकी फेडरल (US Federal) व्याजदर वाढणार असल्याच्या बातम्यांनी शेअर बाजारात घसरण झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

एस्कॉर्ट सिक्युरिटीचे रिसर्च हेड आसिफ इक्बाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या शेअर बाजाराची सर्वात मोठी चिंता अमेरिकी फेडरलच्या वाढत्या व्याजदराची आहे. कारण अमेरिकेत यावर लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो. अशा स्थितीत विदेशी गुंतवणूकदारांसाठी भारतात पैसा गुंतवणे अधिक फायदेशीर ठरणार नाही. त्यामुळे ते भारतातील आपला पैसा काढून घेतील, याचा नकारात्मक परिणाम आज बाजारावर दिसून आला.

तर शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि सौदी अरामकोने आपला करार रद्द करण्याचा आणि त्याचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतल्याची बातमी आली त्याचा तत्काळ परिणाम सोमवारी बाजार सुरू होताच दिसून आला. त्यामुळेच सोमवारी सकाळपासून रिलायन्सच्या शेअरमध्ये घसरण सुरू आहे. अरामको रिलायन्सच्या ऑइल टू केमिकल (O2C)व्यवसायातील 20 टक्के हिस्सा खरेदी करणार होती, परंतु बदलत्या वातावरणात दोघांनीही हा करार रद्द केला आहे. त्यामुळे ब्रोकरेज हाउसने रिलायन्सच्या शेअरचे लक्ष्य 10 टक्क्यांपर्यंत कमी केले आहे.

व्हीएम पोर्टफोलिओचे रिसर्च हेड विवेक मित्तल यांच्या मते, 'शेअर बाजारातील घसरण पुढील काही दिवस कायम राहू शकते. परंतु यामुळे गुंतवणूकदारांना घाबरू नये. ही चांगली संधी आहे. कारण क्रूडची घसरण होत असल्यानं याचा थेट परिणाम कंपन्यांच्या उत्पन्नावर होणार आहे. कंपन्यांचा खर्च कमी होणार असून, नफा वाढणार आहे. मात्र अमेरिकन डॉलरला बळ मिळाल्यानं विदेशी संस्थातमक गुंतवणूकीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांसाठी ही चिंतेची बाब असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (Foreign Institutional Investors-FII) सध्या विक्रीच्या मूडमध्ये आहेत. 18 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) 4,410.9 कोटी रुपयांची विक्री केली आहे तर थेट संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII)3926.53 कोटी रुपयांची खरेदी केली आहे. नोव्हेंबर महिन्यात, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आतापर्यंत 10,000 कोटी रुपयांची विक्री केली आहे, तर थेट संस्थात्मक गुंतवणूकदारांनी जवळपास तेवढ्याच रकमेची खरेदी केली आहे. त्यामुळे सध्या बाजारातील घसरणीचा कल कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र यामुळे देशांतर्गत गुंतवणूकदारांनी घाबरून जाण्याची गरज नाही. कारण सध्या ही गुंतवणूकीसाठी चांगली संधी आहे. सध्या कच्चे तेल स्वस्त होत असल्यानं अर्थव्यवस्था आणि कंपन्यांना त्याचा आधार मिळेल, असंही तज्ज्ञांनी नमूद केलं आहे.

First published:

Tags: Money, Share market