News18 Lokmat

ICICI बँकेनं दिला इशारा, 'या' बचत खात्यांना आहे धोका

ICICI बँकेनं आपल्या ग्राहकांना सावध केलंय. त्यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन हे करावंच लागेल.

News18 Lokmat | Updated On: Apr 12, 2019 02:31 PM IST

ICICI बँकेनं दिला इशारा, 'या' बचत खात्यांना आहे धोका

मुंबई, 12 एप्रिल : देशाची सर्वात मोठी खासगी बँक ICICI नं आपल्या ग्राहकांना सावध केलंय. बँकेनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सांगितलंय की तुमच्या डोअरमॅट बँक खात्यात फ्राॅड होऊ शकतो. यात फिशिंग स्कॅम होऊ शकतो. अशा खात्यांमधून बेकायदेशीर देवाणघेवाण होऊ शकते. अशा खात्यांवर दहशतवाद्यांची नजर असते. तुम्ही एखाद्या बँकेतलं खातं 24 महिने वापरलंच नाही तर ते डोअरमॅट होतं.

खात्यात देवाणघेवाण नाही झाली तर ते होतं बेकायदेशीर - RBI च्या गाइडलाइनप्रमाणे कुठल्याही बँक खात्यांमध्ये एक वर्षापर्यंत काहीच देवाणघेवाण झाली नाही तर ते खातं इनआॅपरेटिव्ह अकाऊंट ठरतं. कुठल्याही फ्राॅडपासून वाचण्यासाठी असं केलं जातं. पण त्या खात्यात पैसे जमा असतील तर त्यावर व्याज मिळतं.
Loading...

बँक खातं होईल डोअरमॅट - तुमचं खातं जेव्हा इनकोआॅपरेटिव्ह होतं, तेव्हा याची सूचना बँक ग्राहकांना देते. त्यानंतरही खात्यात काही देवाण घेवाण झाली नाही तर ते 24 महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला की डोअरमॅट अकाऊंट बनतं.

प्रत्येक बँकेचा डोअरमॅटचा अवधी वेगवेगळा आहे. सरकारी बँकांमध्ये तीन वर्ष काहीच देवाणघेवाण झाली नाही की इनकोआॅपरेटिव्ह म्हणून घोषित केलं जातं. 10 वर्षांनी ते खातं डोअरमॅट होतं. खातं पुन्हा अ‍ॅक्टिव्ह करायचं असेल तर काही चार्जेस लागत नाहीत. पण वापरायचं नसेल तर बंद करा नाहीतर फ्राॅड होऊ शकतो.

काय होतो तोटा? - एकदा का खातं डोअरमॅट झालं की तुम्ही कुठलीच सुविधा वापरू शकत नाही. म्हणजे इंटरनेट बँकिंग, फोन बँकिंग, एटीएम कार्ड या सगळ्या सुविधा बंद होतात.

अ‍ॅक्टिव्ह कसं करायचं? - तुम्हाला त्या बँकेत जाऊन अ‍ॅक्टिव्हेशन फाॅर्म भरावा लागेल.


VIDEO : विनायक मेटेंनी सोडली पंकजा मुंडेंची साथ, सांगितलं कारण...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: ICICI bank
First Published: Apr 12, 2019 02:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...