मराठी बातम्या /बातम्या /मनी /

क्रेडिट कार्ड वापरताना 'या' चुका करु नका; अन्यथा मोठं नुकसान सहन करावं लागेल

क्रेडिट कार्ड वापरताना 'या' चुका करु नका; अन्यथा मोठं नुकसान सहन करावं लागेल

बँकेने सांगितलेल्या रकमेपर्यंत रोख रक्कम काढण्याची सुविधा देखील क्रेडिट कार्डवर दिली जाते, परंतु असे करणे टाळले पाहिजे. पैसे काढण्यासाठी क्रेडिट कार्डऐवजी डेबिट कार्ड वापरल्यास उत्तम राहिल.

बँकेने सांगितलेल्या रकमेपर्यंत रोख रक्कम काढण्याची सुविधा देखील क्रेडिट कार्डवर दिली जाते, परंतु असे करणे टाळले पाहिजे. पैसे काढण्यासाठी क्रेडिट कार्डऐवजी डेबिट कार्ड वापरल्यास उत्तम राहिल.

बँकेने सांगितलेल्या रकमेपर्यंत रोख रक्कम काढण्याची सुविधा देखील क्रेडिट कार्डवर दिली जाते, परंतु असे करणे टाळले पाहिजे. पैसे काढण्यासाठी क्रेडिट कार्डऐवजी डेबिट कार्ड वापरल्यास उत्तम राहिल.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 9 ऑगस्ट : ऑनलाईन शॉपिंग करतांना क्रेडिट कार्डचा पेमेंटच्या वापर करणाऱ्यांसाठी ही बातमी आहे. सध्या ऑनलाइन फसवणुकीसाठी सायबर ठग वेगवेगळ्या आयडिया वापरतात. या घटना रोखण्यासाठी आपणही खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. अशा फसवणुकीपासून दूर राहण्यासाठी काही गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. कॉन्टॅक्टलेस ट्रान्झॅक्शन टाळा वाढत्या डिजिटायझेशनमुळे बहुतेक क्रेडिट कार्ड कॉन्टक्टलेस व्यवहारांची सुविधा देत आहेत. पण ते तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. यामध्ये पिन न टाकता तुम्ही पेमेंट करु शकता. पण चुकून तुमचं कार्ड हरवलं आणि चुकीच्या हातात पडलं तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे हे फीरच बंद करणे शहाणपणाचे आहे. व्यवहार मर्यादा सेट करा क्रेडिट कार्ड धारक त्याच्या गरजेनुसार पॉईंट ऑफ सेल (POS) व्यवहार मर्यादा सेट करू शकतो. या अंतर्गत, जर तुम्ही सामान्यतः 5,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांसाठी कार्ड वापरत नसाल, तर तुम्ही तशी व्यवहार मर्यादा सेट करू शकता. असे केल्याने, तुमचे क्रेडिट कार्ड एका वेळी या मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार करू शकणार नाही. सरकारकडून विवाहित जोडप्यांना मिळतात 72000 रुपये, तुम्हीही घेऊ शकता लाभ आंतरराष्ट्रीय व्यवहार थांबवा क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि परदेशी सहलीला जात नसाल तर तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यवहार सुविधा थांबवू शकता. गरज भासल्यास ते पुन्हा सुरूही करता येईल. तसेच, कोणतेही आंतरराष्ट्रीय ई-कॉमर्स किंवा ऑनलाइन व्यवहार मर्यादित करणे किंवा निष्क्रिय करणे चांगले होईल, कारण बहुतेक आंतरराष्ट्रीय ऑनलाइन व्यवहार साधारणपणे OTP शिवाय पूर्ण होतात. कार्डची मर्यादा निश्चित करा अनेकदा असे दिसून येते की क्रेडिट कार्ड कंपन्या कार्डची मर्यादा वाढवण्यासाठी ग्राहकांना मेसेज पाठवतात आणि वापरकर्ते ती वाढवत जातात. त्यांच्या गरजा कमी असल्या तरी ते तसा निर्णय घेतात. पण तुमच्या गरजेनुसार क्रेडिट कार्डची मर्यादा ठेवणे शहाणपणाचे आहे. जेव्हा गरजा कमी असतील, तेव्हा मर्यादा कमी करा, यामुळे निश्चित रकमेपेक्षा जास्त व्यवहार आपोआप ब्लॉक होईल. गरज भासल्यास मर्यादा वाढवता येऊ शकते. Multibagger Stock: 15 रुपयांचा स्टॉक 3000 रुपयांवर, गुंतवणूकदारांना मालामाल करणारा 'हा' शेअर तुम्हाला माहित आहे का? रोख रकमेसाठी वापरू नका बँकेने सांगितलेल्या रकमेपर्यंत रोख रक्कम काढण्याची सुविधा देखील क्रेडिट कार्डवर दिली जाते, परंतु असे करणे टाळले पाहिजे. पैसे काढण्यासाठी क्रेडिट कार्डऐवजी डेबिट कार्ड वापरल्यास उत्तम राहिल. कारण ज्या दिवशी तुम्ही क्रेडिट कार्डमधून पैसे काढता त्या दिवशी त्यावर व्याज सुरु होते. अशा परिस्थितीत, जर ते फार महत्वाचे नसेल, तर क्रेडिट कार्डमधून पैसे काढणे टाळले पाहिजे.
First published:

Tags: Credit card, Money, Online payments

पुढील बातम्या