मराठी बातम्या /बातम्या /मनी /

डॉली खन्ना यांच्या 'या' आवडत्या स्टॉकला एक्सपर्ट्सकडून BUY रेटिंग, गेल्या आठवड्यात तीन वेळा दिलं अप्पर सर्किट

डॉली खन्ना यांच्या 'या' आवडत्या स्टॉकला एक्सपर्ट्सकडून BUY रेटिंग, गेल्या आठवड्यात तीन वेळा दिलं अप्पर सर्किट

Butterfly Gandhimathi Appliances चा शेअर शुक्रवार व्यतिरिक्त बुधवार आणि गुरुवारी अपर सर्किटला लागला होता, म्हणजे गेल्या आठवड्यातील 5 ट्रेडिंग दिवसांपैकी 3 ट्रेडिंग दिवसांमध्ये हा स्टॉक अपर सर्किटला लागला होता.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 21 डिसेंबर : शेअर बाजारात (Share Market) कालपर्यंत मोठी पडझड झालेली पाहायला मिळाली. अनेक स्टॉक्स त्यांच्या एक-दोन महिन्यांच्या नीच्चांकी पातळीवर आले होते. मात्र शेअर बाजार खाली पडत असतानाही असे काही शेअर होते जे चांगली कामगिरी करत होते. मंदीच्या काळातही काही शेअर्सनी त्यांच्या भागधारकांना चांगला परतावा दिला आहे. Butterfly Gandhimathi Appliances हा असाच एक स्टॉक आहे. प्रसिद्ध गुंतवणूकदार डॉली खन्ना (Dolly Khanna) यांचा या आवडत्या शेअरला शुक्रवारी अप्पर सर्किट लागला होता. कमकुवत जागतिक संकेतांमुळे शुक्रवारी बाजारात मोठी घसरण झाली.

Butterfly Gandhimathi Appliances चा शेअर शुक्रवार व्यतिरिक्त बुधवार आणि गुरुवारी अपर सर्किटला लागला होता, म्हणजे गेल्या आठवड्यातील 5 ट्रेडिंग दिवसांपैकी 3 ट्रेडिंग दिवसांमध्ये हा स्टॉक अपर सर्किटला लागला होता. बाजारातील तज्ञांना या शेअरमध्ये अजून चढ-उताराची अपेक्षा आहे.

रोज 100 रुपये गुंतवा आणि बना करोडपती! गुंतवणुकीची सोपी पद्धत तुम्हाला बनवेल श्रीमंत

Proficient Equities मनोज दालमिया सांगतात की या स्टॉकचा चार्ट पॅटर्न खूपच तेजीचा दिसत आहे. या शेअरसाठी खरेदीचा सल्ला असून 1050 रुपयांच्या आसपास खरेदी करुन 1117 रुपयांचे शॉर्ट टर्म टार्गेट ठेवावे. या खरेदीसाठी 1019 रुपयांचा स्टॉप लॉस लावावा.

चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बगडिया यांनी म्हटलं की हा स्टॉक चार्ट पॅटर्न खूपच तेजीचा दिसतो. नजीकच्या काळात हा शेअर 1070 च्या वर बंद झाल्यास ब्रेकआउट दिसू शकतो. गुंतवणूकदारांना 1100-1150 रुपयांच्या टार्गेटसह सध्याच्या किमतीवर स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला जात आहे. परंतु गुंतवणूकदारांना सल्ला दिला जातो की त्यांनी 970 रुपयांचा छोटा डिप स्टॉप लॉस ठेवावा आणि प्रत्येक 4-5 टक्क्यांच्या घसरणीनंतर आणखी शेअर्स जोडू शकता.

Multibagger Stock : एक रुपयाच्या स्टॉकची कमाल, वर्षभरात एक लाखाची गुंतवणूक बनली 39 लाख

डॉली खन्ना यांचा हा आवडता स्टॉक 2021 चा मल्टीबॅगर ठरला आहे. या शेअरने 460 रुपयांनी वाढ करून यंदा 1045 रुपयांची पातळी गाठली आहे. 2021 मध्ये आतापर्यंत या स्टॉकने 125 टक्के परतावा दिला आहे. Butterfly Gandhimathi Appliances च्या शेअरहोल्डिंग पॅटर्नकडे पाहता, आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत डॉली खन्ना यांचा कंपनीतील हिस्सा 2,12,639 किंवा 1.19 टक्के होता.

First published:

Tags: Investment, Money, Share market