Home /News /money /

Dolly Khanna यांनी केली या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का हा शेअर?

Dolly Khanna यांनी केली या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का हा शेअर?

चेन्नईमधील स्टॉक मार्केट इन्व्हेस्टर डॉली खन्ना (Dolly Khanna Portfolio) कमी किमतीचे मात्र जास्तीत जास्त परतावा देणारे शेअर्स घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तुम्ही देखील त्यांनी गुंतवणूक केलेल्या शेअरमध्ये गुंतवणूक करू शकता.

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर:  त्यांनी घेतलेले शेअर्स (Dolly Khanna Shares) हे तज्ज्ञांच्या अंदाजापेक्षाही कित्येक पटींनी चांगली कामगिरी करतात. डॉली खन्ना यांनी घेतलेले छोटे शेअर्सही स्टॉक मार्केट इंडेक्सला मोठ्या फरकाने मागे टाकतात. त्यामुळेच, डॉली खन्ना यांच्या पोर्टफोलिओवर सर्व गुंतवणुकदारांचे लक्ष असते. त्यांनी नव्याने गुंतवणूक केलेला एक शेअर सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. दोन कोटींहून अधिक गुंतवणूक सध्या डॉली खन्ना यांनी असाच एक छोटा वाटणारा, अजंता सोया (Ajanta Soya) नावाचा शेअर विकत घेतला आहे. बीएसईवर उपलब्ध असणाऱ्या आकडेवारीनुसार, खन्ना यांनी 147.72 रुपये प्रति शेअर या दराने तब्बल 1,40,000 शेअर्स (Dolly Khanna Ajanta Soya) विकत घेतले आहेत. म्हणजेच, खन्ना यांनी अजंता सोयामध्ये 2,06,80,800 रुपयांची गुंतवणूक (Dolly Khanna invests in Ajanta Soya) केली आहे. 22 नोव्हेंबरला हा व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. हे वाचा-PMC ग्राहकांना 10 वर्षांत मिळणार पूर्ण पैसे, RBI ने केली मोठ्या निर्णयाची घोषणा इतर गुंतवणुकदारांचेही लक्ष विशेष म्हणजे, डॉली खन्नांव्यतिरिक्त आणखीही काही गुंतवणुकदारांनी (Investors of Ajanta Soya) अजंता सोयामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. अरुण कुमार जैन यांनी 28 जून 2021 रोजी 93,257 आणि 30 जून 2021 रोजी 93,382 शेअर्स विकत घेतले होते. जैन यांनी 28 आणि 30 जूनला अनुक्रमे 117.05 रुपये आणि 117.92 रुपये प्रति शेअर या दराने ही खरेदी केली होती. तर ऑगस्टमध्ये एम.के. गर्ग यांनी अजंता सोयामध्ये (Ajanta Soya share price) 1,24,000 शेअर्स विकत घेतले होते. 10 ऑगस्ट 2021 रोजी हा व्यवहार पार पडला होता. अजंता सोया ठरलाय मल्टिबॅगर अजंता सोया शेअरचा इतिहास पाहता हा मल्टिबॅगर (Ajanta Soya performance) शेअऱ ठरला आहे. 2021मध्ये हा शेअर 60 रुपयांवरून तब्बल 153.15 रुपयांवर पोहोचला आहे. तसेच, यावर्षी या शेअरने आतापर्यंत 155 टक्क्यांचा परतावा दिला आहे. तर गेल्या वर्षभरात या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 225 टक्के परतावा (Ajanta Soya returns) दिला आहे. गेल्या पाच वर्षांची आकडेवारी पाहता या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना चांगलेच मालामाल केल्याचे दिसून येते. गेल्या पाच वर्षांमध्ये या शेअरने 375 टक्क्यांचा भरघोस परतावा आपल्या गुंतवणुकदारांना दिला आहे. हे वाचा-1 डिसेंबरपासून PNB करणार मोठा बदल, ग्राहकांच्या खिशावर होणार थेट परिणाम सध्याची या स्टॉकची किंमत पाहता तो सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहे. तसेच मोठमोठे गुंतवणुकदार यात रस घेत असल्यामुळे हा स्टॉक आणखी वाढण्याचीही चांगलीच शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर अजंता सोया एक चांगला पर्याय ठरू शकतो.
First published:

Tags: Investment, Money, Savings and investments, Share market

पुढील बातम्या