मुंबई, 02 मे : आता काही दिवसांनी काॅलेज अॅडमिशनची धावपळ सुरू होईल. उच्च शिक्षण दिवसेंदिवस महाग होत चाललेय. यात विद्यार्थी आणि पालकांना शिक्षणाच्या खर्चाचा खूप विचार करावा लागतो. टेंशन वाढतं. पण या समस्येचा उपायही मोठा आहे. बँकांकडून शैक्षणिक कर्ज घेता येतं. जे या देशाचे नागरिक आहेत, देशात-परदेशात ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट किंवा व्यावसायिक शिक्षण घेतायत, त्यांना भारतीय बँका कर्ज देते. या कर्जाची परतफेड शिक्षण संपल्यानंतर एक वर्षानंतर किंवा नोकरी मिळाल्यानंतर 6 महिन्यांनंतर सुरू होते. भारतात शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना 10 लाख रुपये आणि परदेशात शिक्षण घेण्यासाठी 20 लाख रुपयांचं कर्ज मिळतं.
हे कर्ज मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं हे पाहा.
फानी चक्रीवादळाचं रौद्ररूप, ओडिशाचा किनारा रिकामा करण्यास सुरुवात
योग्यतेसाठी अटी
शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी भारतीय हवं. मान्यताप्राप्त प्रोफेशनल किंवा टेक्निकल कोर्समध्ये त्यानं अॅडमिशन घेतली पाहिजे. काही बँकांनी शैक्षणिक कर्जासाठी वयाची मर्यादाही ठेवली पाहिजे. ती 16 ते 35 वर्ष हवी. काही बाबतीत मागच्या परीक्षांमधले कमीत कमी गुणांची अटही असते.
SPECIAL REPORT : बाटली बंद पाणी घेताय, तर सावधान!
4 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज हवं असेल तर भारतातल्या शिक्षणासाठी बँक 5 टक्के आणि परदेशात 15 टक्के मार्जिन मनी कापून घेते. जे विद्यार्थी एवढे पैसे उभे करू शकत नाहीत त्यांना बँक कर्ज देत नाही.
मार्जिन मनी म्हणजे डाऊन पेमेंटची रक्कम. शैक्षणिक कर्जासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमवणारे पालक, पत्नी यांना अर्जदार बनावं लागतं.
कसला आहे समावेश?
शैक्षणिक कर्जामध्ये राहण्याच्या जागेचे चार्जेस, पुस्तकं आणि इक्विपमेंट खरेदी करण्याचा खर्च, परीक्षा आणि लायब्ररी फी, प्रवासाचा खर्च आणि विद्यार्थ्यांसाठी प्रीमियम या गोष्टींचा समावेश आहे.
'भाजपनं आपच्या 7 आमदारांना दिली 10-10 कोटींची ऑफर'
लागणारी कागदपत्रं
अॅप्लिकेशन फाॅर्मबरोबर स्ट्रक्चर आणि अॅडमिशनचं कागदपत्र, केवायसी कागदपत्र, वय, ओळख, पत्ता, बँक स्टेटमेंट, सॅलरी स्लिप आणि आयटी रिटर्न यांसारख्या कागदपत्रांची गरज असते.
4 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी सिक्युरिटीची गरज लागत नाही. 4 ते 7.5 लाख रुपयापर्यंतच्या कर्जासाठी कर्जाच्या रकमेच्या 100 टक्के थर्ड पार्टी गॅरंटी लागते. तुम्ही 7.5 लाख रुपयांचं कर्ज घेतलंत तर त्यासाठी सिक्युरिटी लागते.
याकडे लक्ष द्या
शैक्षणिक कर्जासाठी प्रोसेसिंग चार्ज लागत नाही. याचा इंटरेस्ट रेट हा बँकेच्या संबंधित बेस रेट आणि एका विशेष मार्कअपवरून तयार होतो. यात इन्कम टॅक्समधून फायदाही मिळतो.
SPECIAL REPORT : बुरखाबंदीवरून उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांमध्येच आता 'सामना'!