मुंबई, 29 जानेवारी : इन्कम जर टॅक्सेबल झाले तर लोकांना कर देखील भरावा लागतो. सध्याच्या काळात आपण ऑनलाइन पद्धतीने इन्कम टॅक्स भरता भरत असतो. अनेक लोक हे आपल्या घरीच ऑनलाइन पद्धतीने इन्कम टॅक्स भरतात. मात्र असे करताना थोडीही चूक केल्यास तुम्हाला नुकसान होऊ शकते. यामुळे इन्कम टॅक्स भरताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जेणेकरून कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. टॅक्स फायलिंग करण्याच्या अडचणी आता कमी झाल्या आहेत. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही इन्कम टॅक्स भरु शकता.
बँकेत वारंवार तक्रार करुनही काम होत नाही? थेट RBI करता येते तक्रार, जाणून घ्या प्रोसेस
आता आयकर ऑनलाइनही भरता येतो. म्हणजेच त्याचे ई-फायलिंग करता येते. तुमच्या घरातून किंवा ऑफिसमधून फार कमी वेळात इन्कम टॅक्स रिटर्न भरता येतो. त्याचबरोब इन्कम टॅक्स रिटर्न फाइल केल्यानंतर भरल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. त्याविषयीच आपण जाणून घेणार आहोत.
लेकीचे आर्थिक भविष्य सुधारायचेय? 'या' योजना आहेत बेस्ट
शेवटच्या क्षणी ताण आणि दंड टाळण्यासाठी वेळेवर ITR भरणे महत्वाचे असते. एकदा तुम्ही तुमचा ITR दाखल केल्यावर, आयकर विभागामार्फत एक आयकर पडताळणी फॉर्म तयार केला जातो. जेणेकरून करदात्याला ई-फायलिंगची वैधता सत्यापित करता येईल. तुम्ही डिजिटल स्वाक्षरीशिवाय तुमचे रिटर्न भरले असेल तरच हे लागू होते.
आयकर भरल्यानंतर, इन्कम टॅक्स रिटर्न व्हेरिफिकेशन फॉर्म देखील डाउनलोड करा. हा फॉर्म सोप्या स्टेप्सने डाउनलोड केला जाऊ शकतो. यासाठी इन्कम टॅक्स इंडियाच्या वेबसाइटवर लॉग इन करा. तेथे 'व्ह्यू रिटर्न/फॉर्म' पर्यायावर क्लिक करून ई-फाइल टॅक्स रिटर्न पाहा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Income tax