मराठी बातम्या /बातम्या /मनी /

वारंवार नोकरी बदलत असाल तर 'हे' काम लगेच करा; अन्यथा हातातून जातील PF चे पैसे

वारंवार नोकरी बदलत असाल तर 'हे' काम लगेच करा; अन्यथा हातातून जातील PF चे पैसे

तुम्हाला जर पीएफ खात्यातून पैसे काढायचे असतील किंवा पैसे ट्रान्सफर करायचे असतील त्यासाठी एक प्रक्रिया असते.

तुम्हाला जर पीएफ खात्यातून पैसे काढायचे असतील किंवा पैसे ट्रान्सफर करायचे असतील त्यासाठी एक प्रक्रिया असते.

तुम्हाला जर पीएफ खात्यातून पैसे काढायचे असतील किंवा पैसे ट्रान्सफर करायचे असतील त्यासाठी एक प्रक्रिया असते.

नवी दिल्ली, 18 ऑगस्ट : खासगी क्षेत्रात वारंवार नोकरी (Job) बदलण्याचा ट्रेंड (Trend) पाहायला मिळतो. कोरोना काळात रोजगार किंवा नोकऱ्या अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे नोकरी बदलण्याचा हा ट्रेंड वाढल्याचे चित्र आहे. मात्र नोकरी बदलताना पीएफ खाते (PF Account) ट्रान्सफर करण्याबाबत फारशी माहिती संबंधित कर्मचाऱ्याला नसते. त्यामुळे त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तुम्हाला जर पीएफ खात्यातून पैसे काढायचे असतील किंवा पैसे ट्रान्सफर करायचे असतील त्यासाठी एक प्रक्रिया असते. जाणून घेऊया या प्रक्रियेविषयी...

याबाबतचे वृत्त `टीव्ही 9 हिंदी`ने दिलं आहे. त्यानुसार, कंपनी किंवा नोकरी बदलल्यानंतर आपल्या प्रॉव्हिडंट फंडातील (Provident Fund) रक्कम दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर (Transfer) करणं गरजेचं असतं. नोकरी बदलतेवेळी आपली मागील कंपनी ईपीएफओ सिस्टीममध्ये (EPFO System) एक्झिट दिनांक (Date Of Exit) नमूद करणं बऱ्याचदा विसरुन जाते. त्यामुळे नंतरच्या काळात कर्मचाऱ्याला आपला पीएफ बॅलन्स (PF Balance) ट्रान्सफर करण्यात अडचणी निर्माण होतात. खरंतर यापूर्वी केवळ कंपन्या किंवा एम्प्लॉयर कर्मचाऱ्याने कंपनी जॉईन केल्याची तारीख (Date Of Joining) आणि कंपनी सोडल्याची तारीख तसेच याबाबतची माहिती अपडेट करु शकत होत्या. कंपनीने या दोन तारखा अपडेट न केल्यास कर्मचाऱ्याला कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढण्यास किंवा पैसे ट्रान्सफर करण्यात अडचणी येत होत्या. मात्र आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या सदस्यांच्या सोयीकरिता ही प्रक्रिया अत्यंत सोपी केली आहे. त्यानुसार आता कर्मचारीच नोकरी सोडण्याची तारीख अपडेट करु शकतो.

हे वाचा - पेन्शनर्ससाठी महत्त्वाचे: विधवा, घटस्फोटित मुलीलाही मिळेल Family Pensionचा लाभ

नोकरी सोडल्याची तारीख ईपीएफओमध्ये अशी करा अपडेट

- सर्वप्रथम unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface वर जावे.

- युएएन, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉगइन करावे.

- यानंतर एक नवे पेज तुम्हाला दिसेल. यापेजच्या वरील बाजूस असलेल्या Manage वर क्लिक करावे.

- आता मार्क एक्झिट वर क्लिक करावे.

- त्यानंतर तुम्हाला ड्रॉप डाउनमध्ये सिलेक्ट एम्प्लॉयमेंट दिसेल. यावेळी युएएनशी (UAN) जोडलेला जुना पीएफ अकाउंट नंबर निवडावा.

- त्यानंतर खाते आणि नोकरीचा तपशील तुम्हाला दिसेल.

- आता नोकरी सोडण्याचे कारण आणि तपशील भरा. नोकरी सोडण्याच्या कारणांमध्ये तुम्हाला रिटायरमेंट, शॉर्ट सर्व्हिस असे पर्याय दिसतील.

- Request OTP वर क्लिक करा. त्यानंतर ओटीपी टाकून चेक बॉक्सवर क्लिक करा. - त्यानंतर अपडेटवर क्लिक करा आणि OK करा. आता तुमची माहिती अपडेट झालेली असेल.

आता ईपीएफओ आपल्या सदस्यांना ईपीएफओ सिस्टमवर नोकरी सोडल्याची तारीख अपडेट करण्यास परवानगी देतो. यासाठी कर्मचाऱ्यांना आता कंपनीवर अवलंबून राहण्याची गरज नाही. या नव्या अपडेटमुळं फंडातून पैसे काढणं किंवा ट्रान्सफर करणं सोपं झालं आहे. पीएफ खात्यात Date Of Exit नोंदवण्याची प्रक्रिया खूप सोपी असल्याने तुम्ही घरबसल्या ऑनलाइन (Online) ही प्रक्रिया पूर्ण करु शकता. एकदा नोंदवलेली तारीख तुम्हाला नंतर कोणत्याही परिस्थितीत बदलता येत नाही, ही गोष्ट संबंधित कर्मचाऱ्याने लक्षात घेणं गरजेचं आहे. नोकरी सोडल्यानंतर एक्झिट डेट नोंदवण्यासाठी तुम्हाला दोन महिने वाट पाहावी लागते. कारण पीएफ खात्यात संबंधित कंपनीने अखेरचा रकमेचा वाटा जमा केल्यानंतर दोन महिन्यांनी ते अद्ययावत केले जाते.

First published:

Tags: Epfo news, Money, PF Amount