Home /News /money /

Covid-19 : कोरोनामध्ये रेल्वेने प्रवास करताय? मग घ्या ही काळजी

Covid-19 : कोरोनामध्ये रेल्वेने प्रवास करताय? मग घ्या ही काळजी

जर तुम्ही रेल्वेने प्रवास कारण्यासंबंधी काही विचार करत आहात, तर त्यासाठी सरकारने "काय करावे आणि काय करू नये" याची नियमावली तयार केली आहे. पाहूया ही नियमावली.

    नवी दिल्ली, 01 ऑक्टोबर : देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे; त्यामुळे प्रवास करताना बरेचसे बदल करण्यात आले आहेत. तिकीट बुक करण्यापासून ते रेल्वेतून प्रवास करताना कोणती काळजी घ्यावी हे नियम तयार करण्यात आले आहे. लॉकडाउन आता हळूहळू अनलॉक होत आहे. त्यामुळे लोक व्यावसायिक किंवा वैयक्तिक कामांसाठी रेल्वेने प्रवास करत आहेत. एक किंवा त्यापेक्षा अधिक दिवस जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त खबरदारी आता घ्यावी लागणार आहे. जर तुम्ही रेल्वेने प्रवास कारण्यासंबंधी काही विचार करत आहात, तर त्यासाठी सरकारने "काय करावे आणि काय करू नये" याची नियमावली तयार केली आहे. पाहूया ही नियमावली. 1. प्रवासाची तिकिटं ऑनलाईन म्हणजेच आयआरसीटीसी किंवा मोबाईलद्वारे बुक करावी. ट्रेन सुटण्याच्या 24 तास आधी तिकीट रद्द करणे शक्य आहे. 2. ट्रेनमध्ये पूर्वीसारखे खाण्याचे सर्व प्रकार आता मिळणार नाही. संपूर्ण पॅक असलेले पदार्थ उपलब्ध असतील. चहा, कॉफी, पाण्याची बाटली काही ठराविक ट्रेनमध्ये पैसे देऊन देण्यात येतील. जेवणाचे प्रकार यापुढे कोविडचं संकट संपेपर्यंत ट्रेनमध्ये मिळणार नाही. (हे वाचा-Silver Lake चे सह-गुंतवणूकदार करणार रिलायन्स रिटेलमध्ये 1,875 कोटींची गुंतवणूक) 3. प्रवाशांनी त्यांच्यासोबत पिण्याच्या पाण्याची बाटली आणि जेवण स्वतःसोबत घेऊन जावं. 4. प्रवासादरम्यान संपूर्ण वेळ मास्क घालणं बंधनकारक आहे. तसेच स्थानकावर तिकीट चेकिंग आणि थर्मल चेकिंगसाठी लांब रांग लावावी लागू नये यासाठी प्रवाशांनी वेळेआधी येणं गरजेचं आहे. (हे वाचा-गाडी चालवताना खिशात लायसन्स नसेल तरी नो टेन्शन! आजपासून बदलला हा नियम) 5. बेडिंग आणि पडदे यासारख्या सर्व मूलभूत सोयीसुविधा ट्रेनमध्ये उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांनी स्वतःचे ब्लँकेट्स घेऊन यावं. 6. प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्स ठेवणं महत्वाचं आहे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी दिलेल्या नियमावलीची अंमलबजावणी करणे. 7. सर्व प्रवाशांनी त्यांच्या स्मार्टफोनमध्ये आरोग्य सेतू अॅप्लिकेशन डाऊनलोड करून ते वापरणे बंधनकारक आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona, Coronavirus

    पुढील बातम्या