मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Stocks to Buy : दिवाळीच्या दिवशी 'हे' स्टॉक्स खरेदी करण्याचा SMC Global चा सल्ला

Stocks to Buy : दिवाळीच्या दिवशी 'हे' स्टॉक्स खरेदी करण्याचा SMC Global चा सल्ला

येत्या काळात चांगली कमाई करू शकतील अशा स्टॉक्सची माहिती SMC Global ने दिली आहे. याचा फायदा गुंतवणूकदारांना होऊ शकतो.

येत्या काळात चांगली कमाई करू शकतील अशा स्टॉक्सची माहिती SMC Global ने दिली आहे. याचा फायदा गुंतवणूकदारांना होऊ शकतो.

येत्या काळात चांगली कमाई करू शकतील अशा स्टॉक्सची माहिती SMC Global ने दिली आहे. याचा फायदा गुंतवणूकदारांना होऊ शकतो.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 21 ऑक्टोबर : ब्रोकरेज फर्म SMC Global ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, आर्थिक निर्बंध उठवल्यामुळे कंपन्यांच्या कमाईमध्ये मजबूत रिकव्हरी होत आहे, ज्यामुळे शेअर बाजारात बुल रन सुरू राहणार आहे. जर तुम्ही देखील दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर SMC Global ने तुमच्यासाठी काही शेअर्सची निवड केली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, हे स्टॉक्स येत्या काळात चांगली कमाई करू शकतात. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) एसबीआयच्या उत्पन्नात मोठी वाढ होत आहे. त्याचबरोबर त्याचे क्रेडिट लॉग देखील खाली आले आहे. ब्रोकरेजने एसबीआयला 577 रुपयांच्या टार्गेट किमतीसह बाय रेटिंग दिले आहे. ब्रोकरेजनुसार, एसबीआयचे शेअर्स पुढील 8-10 महिन्यांत या किमतीत पोहोचू शकतात. आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) कर्ज वाढीऐवजी किमान जोखमीसह आपला ऑपरेटिंग प्रॉफिट वाढवण्यावर बँक भर देत आहे. म्हणूनच, पुढील 8-10 महिन्यांत हा शेअर 874 रुपयांच्या किमतीपर्यंत पोहोचू शकतो अशी अपेक्षा आहे. Rakesh Jhunjhunwala यांची कमाल; Tata Motors DVR मध्ये गुंतवणूक वाढनताच शेअर्स 10 टक्क्यांनी वधारले L & T कंपनी कंपनी भारतातील E & C विभागात अव्वल स्थानी कायम आहे. भविष्यात देशातील पायाभूत सुविधांवर होणाऱ्या प्रचंड खर्चाचा फायदा घेण्याच्या स्थितीत कंपनी असेल. SMC ने या शेअरसाठी 2120 रुपयांची टार्गेट प्राईज दिली आहे. DLF कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत व्यवसायावर परिणाम होत असूनही, डीएलएफने आपली आर्थिक कामगिरी कायम ठेवली आहे. अशा स्थितीत, ब्रोकरेजने या स्टॉकसाठी 474 रुपये टार्गेट प्राईज दिली आहे. 'या' शेअरमधून गुंतवणूकदारांना वर्षभरात 168 टक्के रिटर्न्स, अजूनही गुंतवणुकीची संधी Endurance Tech कंपनीची बॅलेन्स शीट मजबूत आहे आणि त्यांची लिक्विडिटी पोझिशन देखील चांगली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी सरकारने अनेक दिलासादायक घोषणा केल्या आहे. याचाही फायदा कंपनीला होईल. एसएमसीने पुढील 8-10 महिन्यांसाठी या स्टॉकला 2,047 रुपयांची टार्गेट प्राईज दिली आहे. वेलस्पुन इंडिया (Welspun India) ब्रोकरेज फर्मने या स्टॉकसाठी 193 रुपयांची टार्गेट किंमत दिली आहे. कंपनी दीर्घकाळापर्यंत फायदेशीर वाढ साध्य करण्यासाठी वचनबद्ध आहे. प्रेस्टिज इस्टेट्स (Prestige Estates) ब्रोकरेज फर्मने सांगितले की, प्रेस्टिज इस्टेट्सने या तिमाहीत विक्रमी सेल केला आहे. कंपनीने अनेक नवीन प्रकल्पही सुरू केले आहेत, ज्यामुळे त्यांची विक्री वाढण्यास मदत झाली आहे. त्यामुळे, स्टॉकसाठी 529 रुपयांची टार्गेट प्राईज देण्यात आली आहे. केईसी इंटरनॅशनल (KEC International) ब्रोकरेज फर्मनुसारनुसार, कंपनी चांगली कामगिरी करत आहे. येत्या 8 ते 10 महिन्यांच्या कालावधीसाठी शेअर 555 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
First published:

Tags: Investment, Share market, Stock Markets

पुढील बातम्या