नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर: दिवाळीचा दिवस शेअर (Share Market update on Diwali 2021) बाजारासाठी खूप खास असतो. या दिवशी बाजार बंद असला तरी या दिवशी मुहूर्त ट्रेडिंग (Diwali Muhurat Trading Update) एका तासासाठी आयोजित केले जाते. या दरम्यान मार्केटमध्ये फक्त 1 तास व्यवहार होतो. या एका तासात गुंतवणूकदार छोटी गुंतवणूक करून बाजाराची परंपरा पाळतात. जर तुम्ही पैसे कमावण्याचा किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या दिवशी तुम्ही पैसे गुंतवू शकता. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.
यावर्षी दिवाळीच्या निमित्ताने 4 नोव्हेंबर 2021 रोजी मुंबई शेअर बाजारात (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) संध्याकाळी 6:15 वाजल्यापासून एक तासाचा विशेष मुहूर्त असेल. दिवाळीला मुहूर्ताच्या ट्रेडिंगमध्ये संध्याकाळी 6 ते संध्याकाळी 6.08 पर्यंत प्री-ओपन ट्रेडिंग सत्र असेल. यानंतर मुहूर्त ट्रेडिंग संध्याकाळी 6:15 ते संध्याकाळी 7:15 पर्यंत होईल, असं बीएसई आणि एनएसईने सांगितलं आहे.
हे वाचा-Petrol-Diesel वरील उत्पादन शुल्क कमी, केंद्राचं होणार 1 लाख कोटींचे नुकसान
मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय?
मुंबई शेअर बाजार अर्थात बीएसई (Muhurat Trading in BSE) आणि राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसई (Muhurat Trading in NSE) दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगचं आयोजन करतात. लक्ष्मीपूजनादिवशी शेअर बाजाराला सुट्टी असली तरी मुहूर्ताच्या ट्रेडिंगसाठी बाजारात फक्त 1 तास ट्रेडिंग केलं जातं. या एका तासात गुंतवणूकदारआपली छोटी गुंतवणूक करून बाजाराची परंपरा पाळतात. मुहूर्ताच्या वेळी केलेली गुंतवणूक शुभ असते, असं मानलं जातं.
दिवाळीसह विक्रम संवतानुसार नवीन वर्षाची सुरुवातदेखील होते. या वेळी विक्रम संवत 2077 ची सुरुवात होणार आहे. भारतीय परंपरेनुसार, दिवाळीसह देशाच्या अनेक भागांमध्ये नवीन आर्थिक वर्षाची सुरुवातही होते. या शुभ वेळेला शेअर बाजारातले व्यापारी विशेष शेअर ट्रेडिंग करतात. म्हणून याला मुहूर्त ट्रेडिंग असं म्हणतात.
हे वाचा-Cryptocurrency: या 6 नाण्यांमुळे गुंतवणूकदार मालामाल, दिवसाला 2,340.75% चा फायदा
मुहूर्ताच्या ट्रेडिंगच्या दिवशी शेअर बाजारात पैसे गुंतवणं शुभ मानलं जातं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. विशेषतः श्रीमंत व्यक्ती निश्चितपणे या दिवशी गुंतवणूक करतात. ते छोट्या गुंतवणुकीवर लाखो रुपये कमवतात. दिवाळीच्या विशेष मुहूर्तावर ट्रेडिंग करून सुरू करून गुंतवणूकदार नवीन आर्थिक वर्ष चांगलं जाण्याची इच्छा व्यक्त करतात. मुहूर्त ट्रेडिंग पूर्णपणे परंपरेशी संबंधित आहे. बहुतेक जण या दिवशी शेअर्स खरेदी करतात. तथापि, ही गुंतवणूक अत्यंत लहान आणि प्रतीकात्मक असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
बाजार तज्ज्ञांच्या मते, मुहूर्ताच्या ट्रेडिंगदिवशी व्यापारी गुंतवणुकीचा विचार करून बाजारात प्रवेश करतात. परंपरा मानणारे सहसा पहिली ऑर्डर खरेदीची देतात. मागील काही वर्षांमध्ये मुहूर्ताच्या ट्रेडिंगमध्ये शेअर बाजार बहुतांश प्रसंगी एका मर्यादेतच राहिला असल्याचं दिसून येतं. तसंच काही काळ बाजारात तेजीही दिसून आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Diwali 2021, Money, Share market