नवी दिल्ली, 09 नोव्हेंबर : दिवाळी जवळ येत आहे आणि दिवाळीच्या भेटवस्तू , गिफ्ट देणं-घेणं सध्या सुरू आहे. असं असताना तुम्हाला गिफ्ट टॅक्सबद्दल माहिती आहे का? ते माहीत नसेल तर कदाचित तुम्हाला जास्त टॅक्स भरावा लागेल किंवा टॅक्स बुडवल्याबद्दल तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस येऊ शकते.
केंद्र सरकारनी 1958 मध्ये गिफ्ट टॅक्स अक्ट तयार केला होता. ज्याअंतर्गत काही विशिष्टप्रसंगी गिफ्टवर टॅक्स लावायला सुरुवात झाली. ऑक्टोबर 1998 मध्ये हा कायदा मागे घेण्यात आला पण 2004 मध्ये पुन्हा केंद्र सरकानी हा कायदा इन्कम टॅक्स प्रोव्हिजन्समध्ये समाविष्ट केला. तसंच 2017-18 मध्ये प्रसिद्ध केलेल्या ITR नोटिफिकेशननुसार करदात्यांना मिळालेल्या गिफ्टचा खुलासा करणं बंधनकारक आहे.
वाचा-100 रुपये बचतीतूनही करू शकता मोठी गुंतवणूक; चांगल्या रिटर्न्ससह सरकारी गॅरंटीही
एका आर्थिक वर्षात जर तुमच्या मित्राकडून किंवा अनोळखी व्यक्तीकडून तुम्हाला गिफ्ट म्हणून 50 हजार रुपये मिळाले तर त्यावर कोणताही कर लागू नाही. जर गिफ्ट मिळालेल रक्कम 50 हजारांहून जास्त असेल तर त्या पूर्ण रकमेवर इतर स्रोतांतून झालेली मिळकत म्हणून कर भरावा लागतो. कुटुंबातील व्यक्ती किंवा नातेवाईकाने दिलेल्या गिफ्टवर कोणताही कर लागू होत नाही. लग्नात आणि मृत्युपत्राद्वारे दिल्या गेलेल्या रकमेवर कर लागू होत नाही.
वाचा-दिवाळीआधी शेअर बाजारात मोठी उसळी, गुंतवणूकदारांनी कमवले 2 लाख कोटी
गिफ्ट मिळालेल्या प्रॉपर्टीवर टॅक्स लागू
तुम्हाला कोणी गिफ्ट म्हणून प्रॉपर्टी दिली तर त्यावर स्टँप ड्युटीअंतर्गत कर लागू होतो. यातही नातेवाईक किंवा कुटुंबातील व्यक्तीनी दिलेल्या प्रॉपर्टीवर कुठलाही टॅक्स लागू होत नाही.