Home /News /money /

ताण वाढवणारे नव्हे ताण हलका करणारे! दिवाळीची मिठाई आणि फराळासाठी माझ्याकडून काही टीप्स

ताण वाढवणारे नव्हे ताण हलका करणारे! दिवाळीची मिठाई आणि फराळासाठी माझ्याकडून काही टीप्स

स्वयंपाकघरात खूप कष्ट घेणे म्हणजे खूप छान दिवाळी (Diwali 2020) नव्हे. त्याऐवजी वेगळ्या प्रकारे विचार करा. तुम्हाला अत्यंत कष्ट करून मिठाया आणि फराळ बनवण्याची गरज नाही.

    2020 हे या जगासाठी एक वेगळंच वर्ष ठरलं. अभूतपूर्व आणि कठीण आव्हानांना तोंड दिल्यावर हे वर्ष खूप कठीण आहे असे म्हणता येईल. या महामारीने आपल्याला सर्वांना बुचकळ्यात टाकले आहे- कामाचे स्वरूप बदलले आहे, शाळांचे स्वरूप बदलले आहे, आणि किमान यावर्षी तरी आता आपली सणांना साजरे करण्याची पद्धतही बदलणार आहे. यावर्षीची दिवाळी आपण यापूर्वी साजऱ्या केलेल्या दिवाळीपेक्षा वेगळी असेल, आणि कदाचित तिला दुःखाची एक किनार असू शकेल. अखेर, आपण संपूर्ण वर्षभर या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो ना? पण याचा अर्थ असा नाही, की 2020मध्ये आपण दिवाळी साजरी करूच नये. ही परिस्थिती सुधारण्याचे आणि निरोगी आणि सुरक्षित अशा प्रकारे दिवाळीचा आनंद घेण्याचे अनेक मार्ग आहेत. माझ्या मते, अन्नपदार्थ- म्हणजे चांगले पदार्थ- हा यावर्षी दिवाळी साजरी करण्याचा प्रभावी व वास्तविक मार्ग आहे. सर्वांना खाण्याची आवड असते. सणाच्या वातावरणात, विशेषकरून दिवाळीत वेगवेगळे खाद्यपदार्थ आवडत नाहीत असा माणूस मला तरी माहिती नाही. यावर्षी बऱ्याचशा मिठाया आणि फराळ घरी बनवणे शक्य नसले, तरीही स्वच्छतेच्या बाबतीत कायम संशयाच्या भोवऱ्यात असणारी कोणतीही सुट्टी मिठाई खरेदी करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला केवळ योग्य निवड केली आहे याची खात्री करायची आहे. तुम्हाला अधिक आरोग्यदायी, सुरक्षित आणि अर्थातच स्वादिष्ट अशा पदार्थांची निवड करायची आहे. अखेर, दिवाळी म्हटली की चविष्ट पदार्थांची रेलचेल आलीच! आणि ही महामारी असो वा नसो त्यात बदल करण्याची गरजच नाही. आपली दिवाळी ताणमुक्त आणि तणावरहित आणि खूप आनंददायी बनावी यासाठीचे हे तीन मार्ग आहेत. यामध्ये सोपेपणा ठेवा आपल्या दिवाळीच्या पदार्थांना उगाचच कठीण करू नका- मिठाया आणि फराळ बनवणे हे दोन्हीही. लक्षात ठेवा, स्वयंपाकघरात खूप कष्ट घेणे म्हणजे खूप छान दिवाळी नव्हे. त्याऐवजी वेगळ्या प्रकारे विचार करा. तुम्हाला अत्यंत कष्ट करून मिठाया आणि फराळ बनवण्याची गरज नाही. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आवडणाऱ्या ठराविक पदार्थांची निवड करा आणि केवळ तेवढेच पदार्थ बनवा. किंवा, आपण एखादे चांगले क्वालिटी आईसक्रीम आणि पॅक्ड फराळ यांसारखे तयार पॅक्ड पदार्थ खरेदी करू शकता. हे सुट्ट्या मिठाईपेक्षा नक्कीच चांगले असतात आणि यावर्षीच्या उत्सवांमध्ये एक चांगली भर पडेल. लक्षात ठेवा, जे अत्यंत स्वच्छता बाळगून पॅक केले असल्याचे आपल्याला माहिती असेल केवळ असेच उत्पादन खरेदी करा, म्हणजे आपले कुटुंब निश्चिंत होऊन या सुरक्षित पदार्थांचा आनंद घेऊ शकेल. या दिवाळीमध्ये ‘सुरक्षित’ रहा दिवाळीतील सुरक्षेविषयी जेव्हा बोलले जाते तेव्हा ते केवळ फटाक्यांशी निगडीत असे काहीतरी असते. या वर्षी, सुरक्षिततेला एक नवीन अर्थ आहे- चांगले आरोग्य आणि स्वच्छता. हे टाळणे अत्यंत जोखमीचे आहे. म्हणूनच कोणत्याही सुट्ट्या मिठाई किंवा फराळापेक्षा तयार आणि पॅक्ड पदार्थांचा पर्याय व्यवहार्य ठरतो. प्रतिष्ठीत ब्रॅन्ड्स आणि उत्पादक नेहमीच पदार्थांच्या बनावटीमध्ये  मानवी हस्तक्षेप होणार नाही याची काळजी घेतात- आणि सर्वांत पहिल्यांदा तुमचेच हात या पदार्थांच्या संपर्कात येतात. त्यामुळे हे पदार्थ सेवन करण्यासाठी सुरक्षित बनतात. तर, या दिवाळीमध्ये घरगुती पदार्थांबरोबरच आरोग्यकारक आणि विविध प्रकारचा पॅक्ड सुका मेवा आणि आईसक्रीम खाऊन पदार्थांमध्ये रंगत आणि वैविध्य आणा. अर्थातच, आपण नेहमी न्युट्रिशन लेबल काळजीपूर्वक वाचले पाहिजे. आणि या सर्व पदार्थांचा आनंद नियंत्रित प्रमाणातच घेतला पाहिजे. दिवाळी या महत्त्वाच्या सणादरम्यान आणि त्यानंतरही जाणीवपूर्वक सुरक्षित व निरोगी राहणे व जबाबदारीने दिवाळी साजरी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पोषक पर्याय निवडा या महामारीने आपल्याला दिलेला एक महत्त्वपूर्ण धडा म्हणजे निरोगी राहणे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे यांचे महत्त्व होय. सुदैवाने, आपल्याला चवीसाठी आरोग्याशी तडजोड करावी लागणार नाही. आपल्याला केवळ इतकेच करायचे आहे की, काही स्मार्ट आणि पोषक पदार्थ घरच्या घरी बनवायचे आहेत. उदाहरणार्थ, तळलेल्या पदार्थांऐवजी भाजलेले पदार्थ निवडा, आणि तरीही तळलेले पदार्थ खायचे असतील तर ते घरीच बनवलेले असतील याकडे लक्ष द्या, म्हणजे त्यातील घटकपदार्थ आणि तेलाची गुणवत्ता यांबाबत शंका राहणार नाही. तसेच पॅक्ड पदार्थ खरेदी करताना, लेबल्स काळजीपूर्वक वाचा व घटकपदार्थांची यादी तपासा, आणि अधिक पथ्यकर आणि अधिक पोषक पदार्थ निवडा. आरोग्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही भागीदारीतील पोस्ट आहे. Written By Kavita Devgan, Nutritionist, Columnist and Speaker
    First published:

    पुढील बातम्या