3 लाखात सुरू करा 'हा' व्यवसाय, दर महिन्याला 2 लाख रुपये कमाई नक्की

3 लाखात सुरू करा 'हा' व्यवसाय, दर महिन्याला 2 लाख रुपये कमाई नक्की

तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, तर खूप पर्याय आहेत. सरकारही तुम्हाला मदत करतं.

  • Share this:

मुंबई, 31 मे : हल्ली लोक डिस्पोजेबल कप, प्लेट, बाऊल यांसारख्या वस्तू जास्त वापरतात. कुठलाही कार्यक्रम असो किंवा प्रवासात यांचा उपयोग केला जातो. तुम्हाला कमी पैशात व्यवसाय सुरू करायचाय, शिवाय त्याला सरकारची मदत मिळेल असं हवं असेल तर डिस्पोजेबल प्राॅडक्सचं युनिट तुम्ही सुरू करू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त 2 ते 3 लाख रुपये गुंतवणूक करावी लागेल. जाणून घेऊ या त्याबद्दल-

डिस्पोजेबल कॅटरिंग प्राॅडक्टची गरज शहरात आणि गावात दोन्ही ठिकाणी असते. ग्रामीण भागात जास्त करून पेपर प्लेटची गरज असते. यासाठी छोट्या मशीननंही काम होऊ शकतं. पेपर कप प्लेट आॅटोमेटिक मशीनची बाजारातली किंमत 2 ते 3 लाख रुपये आहे. मशीन घेतल्यानंतर कच्चा माल खरेदी करावा लागतो. त्यानंतर तुम्ही काम सुरू करू शकता.

मोदी 2.0चे शेअर बाजारात जोरदार स्वागत, सेन्सेक्स 40 हजारांवर!

एकदा का वस्तू बनणं सुरू झालं की तुम्हाला मार्केटिंग चांगल्या प्रकारे करायला हवं. अनेक ठिकाणी तुम्हाला तुमचा माल पोचवावा लागेल. त्याची अशी वेगळी ओळख बनवावी लागेल. एक किलोग्रॅम कच्च्या मालात 300 प्लेट्स तयार होतात. एक किलो थर्मोकाॅल मटेरियल 200 ते 250 रुपये प्रति किलोग्रॅम मिळतं. तर 100 प्लेट्सना 200 ते 300 रुपये पडतात.

राज्यात 15 जून नंतरच पावसाचं आगमन होणार

अशा प्रकारे तुम्ही एका दिवसात 1 हजार प्लेट तयार बनवल्यात तर, महिन्याला 60 ते 80 हजार रुपये कमाई करू शकता. यात खर्च वजा करून नफा पाहिलात तर 50 हजार रुपये दर महिन्याला कमावू शकता. माल तयार झाल्यावर जे वेस्टेज होतं त्याला रिसायकलिंग करून 50 टक्के किमतीत विकता येतं.

थर्मोकाॅल प्लेटमध्ये होतो फायदा

थर्मोकाॅल प्राॅडक्टमध्ये खूप फायदा आहे. प्लॅस्टिकवर सगळीकडे बंदी घातल्यावर थर्मोकाॅल आणि पेपर प्राॅडक्टची मागणी वाढलीय. थर्मोकाॅल कप-प्लेट बनवण्याची मशीन खरेदी करण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 लाख रुपये खर्च करावे लागतील. सुरुवातीला कसली विक्री करायची हे ठरवावं लागेल. मग कच्चा माल खरेदी करून व्यवसाय सुरू करता येईल.

Life In लोकल- बाबा आज तुमचा ऑफिसचा शेवटचा दिवस आहे म्हणून...

कंपनी आणि रेस्टाॅरंटसोबत करार करून व्यवसाय मोठा करू शकता

थर्मोकाॅलशिवाय पेपर कप आणि बाऊल बनवण्याची मशीन 3 लाख रुपयापर्यंत मिळते. बाजारात काॅफी आणि कोल्डड्रिंक्ससाठी पेपर कप आणि ग्लास वापरले जातात. यात तुम्ही रेस्टाॅरंट किंवा कंपनींशी करार करू शकत असाल, तर त्यांचं लेबल वापरून तुम्ही माल पुरवू शकता. अशा प्रकारे तुम्ही बराच काळ योग्य कमाईचं स्रोत तयार करू शकता.

सरकारही करते मदत

सरकार तुम्हाला 90 टक्के कर्ज देते. खादी ग्रामोद्योगमध्येही डिस्पोजेबल कॅटरिंग प्राॅडक्ट मेकिंग व्यवसायाची यादी तयार केलीय. या योजनेत तुम्हाला 25 टक्के सबसिडी दिली जाते.

EXCLUSIVE VIDEO : शपथविधीनंतर अरविंद सावंत यांची पहिली प्रतिक्रिया

First published: May 31, 2019, 12:32 PM IST
Tags:

ताज्या बातम्या