Home /News /money /

सर्वात स्वस्त गृहकर्ज! ही कंपनी 4 टक्क्यांपेक्षा कमी व्याजदराने देत आहे Loan; वाचा सविस्तर

सर्वात स्वस्त गृहकर्ज! ही कंपनी 4 टक्क्यांपेक्षा कमी व्याजदराने देत आहे Loan; वाचा सविस्तर

फेस्टिव्ह सीझनमध्ये (Festive Season)अनेक बँका कमी व्याजदराने कर्ज देत आहेत. मात्र एक कंपनी अशी आहे की, जी केवळ 3.99 टक्के दराने गृहकर्ज उपलब्ध करून देत आहे.

    मुंबई, 21 ऑक्टोबर : फेस्टिव्ह सीझनमध्ये (Festive Season) देशातील विविध बँका गृह आणि वाहन कर्जावरील व्याजदर कमी करत आहेत. जर तुम्ही घर किंवा गाडी खरेदी करण्याची योजना आखत असाल तर ही चांगली संधी आहे. कारण फेस्टीव्ह सीझनमध्ये अनेक बँका स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देत आहेत. सरकार आणि आरबीआयकडून देखील रिअल इस्टेट क्षेत्राला दिलासा देण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत. दरम्यान टाटा हाऊसिंगने (Tata Housing) देखील एक उत्तम योजनेची घोषणा केली आहे. टाटा हाऊसिंग होम लोन ((Tata Housing Home Loan) टाटा हाऊसिंगच्या या योजनेअंतर्गत घर खरेदी करणाऱ्यांना गृह कर्जावर एका वर्षासाठी केवळ 3.99 टक्के व्याजदर द्यावा लागेल. संभाव्य ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उर्वरित खर्च कंपनी देणार आहे. ही योजना 20 नोव्हेंबरपर्यंत 10 प्रकल्पांसाठी वैध आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार बुकिंगनंतर मालमत्तेनुसार 25,000 ते आठ लाख रुपयांपर्यंतचे गिफ्ट व्हाउचर ग्राहकांना मिळतील. दहा टक्के भरल्यानंतर आणि प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन केल्यानंतर व्हाउचर देण्यात येईल. (हे वाचा-कोरोना काळात जगभरातील अर्थव्यवस्थांचं कंबरडं मोडलंय, चीनचा GDP मात्र वधारला) या फेस्टिव्ह सीझनमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी बँक देखील स्वस्त गृह आणि वाहन कर्जाची ऑफर देत आहे. आरबीआयने काही दिवसांपूर्वीच रेपो रेटमध्ये कपात केली होती. याच आधारावर बँका ग्राहकांना स्वस्त कर्जाची संधी देत आहेत. बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया 20 वर्षांच्या कालावधीसाठी 75 लाख रुपयांच्या गृह कर्जावर 6.85 टक्के दराने कर्ज देत आहेत. यानंतर, कॅनरा बँक आणि पंजाब अँड सिंध बँक या दोन्ही बँका 6.90 टक्के व्याज दराने 75 लाख रुपयांचे कर्ज देत आहेत. त्याचवेळी एसबीआय 7.20 टक्के व्याजदराने कर्ज देत आहे. एचडीएफसी लिमिटेड आणि एलआयसी हाउसिंग फायनान्स 75 लाख रुपयांच्या गृह कर्जावर 7 टक्के व्याज आकारत आहेत. (हे वाचा-PF खातेधारकांसाठी अलर्ट! Google सर्चमध्ये दिसणारा EPFOचा मोबाइल क्रमांक बनावट) याशिवाय कोटक महिंद्रा बँक स्वस्त गृह कर्जासह, कर्ज प्रक्रिया शुल्क माफी, अॅग्री आणि रिटेल कर्ज ऑनलाइन देत आहे. कोटक महिंद्राने गृह कर्जावरील व्याजदर 7 टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत. वार्षिक 7 टक्के दराने गृहकर्ज सुरू होत असल्यची माहिती बँकेने दिली आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Money

    पुढील बातम्या