Home /News /money /

Air India ने केली 'या' प्रवाशांना डिस्काउंट देण्याची घोषणा, वाचा कशी मिळेल 50% सवलत

Air India ने केली 'या' प्रवाशांना डिस्काउंट देण्याची घोषणा, वाचा कशी मिळेल 50% सवलत

एअर इंडियाची (Air India) ही स्कीम देशभरातील सर्व मार्गांसाठी लागू होत आहे. ही सवलत ज्या वर्गाला देण्यात येत आहे त्यांनी किमान 3 दिवस आधी तिकिट बुकिंग करणं आवश्यक आहे.

    नवी दिल्ली, 16 डिसेंबर: देशातील सरकारी विमानकंपीन एअर इंडियाने (Air India) प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी खास स्कीम सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना खास सवलत देण्यात येतआहे. जर ज्येष्ठ नागरिक एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणार असतील, तर त्याना फ्लाइटच्या बेसिक फेअरमध्ये 50 टक्क्यांची सूट मिळेल. नागरी उड्डाण मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. एअर इंडियाची ही योजना देशभरातल सर्व रुटसाठी आहे. मात्र याकरता ज्येष्ठ नागरिकांना किमान तीन दिवस तिकिट बुक करणं आवश्यक आहे. मंत्रालयाच्या माहितीनुसार जेव्हा सीनिअर सिटिझन एअर इंडियाच्या फ्लाइटने प्रवास करतील तेव्हा त्यांच्याकडे काही दस्तावेज असणं आवश्यक आहे. त्यांच्याकडे ओळखपत्र असणं गरजेचं आहे, ज्यावर जन्मतारखेचा उल्लेख असणं आवश्यक आहे. शिवाय नागरी उड्डाण मंत्रालयाने असं म्हटलं आहे की जर या प्रवाशांकडे ओळखपत्र नसेल तर त्यांना ही सूट दिली जाणार नाही. अशावेळी ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण भाडं द्यावं लागेल. (हे वाचा-Gold Rates Today: सोन्याच्या दराचा चढता ग्राफ! चांदीही 1185 रुपयांनी महागली) एअर इंडियाच्या वेबसाइटनुसार एखादे लहान मुल ज्येष्ठ नागरिक प्रवाशासह प्रवास करत असेल तर, तर त्या प्रवाशाला मुलाच्या तिकिटाचे संपूर्ण भाडे द्यावे लागेल. त्याच वेळी, आपण एअर इंडियाच्या सर्व नियमांबाबतची माहिती तुम्ही http://www.airindia.in/senior-citizen-concession.html या वेबसाइटवरून मिळवू शकता. (हे वाचा-ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! साखर निर्यातीबाबत मोठा निर्णय) देशांतर्गत विमानप्रवासावर मिळेल सूट एअर इंडियाच्या माहितीनुसार 60 वर्षाहून अधिक वयाच्या प्रवाशांना देशांतर्गत उड्डाणांवर सूट देण्यात आली आहे. त्याचबरोबर या सवलतीचा फायदा फक्त इकॉनॉमी केबिनच्या बुकिंगवरच देण्यात येईल. ज्येष्ठ नागरिकांनी तिकिट बुक केल्यास त्यांना बेसिक फेअरचे 50 टक्के पैसे द्यावे लागतील. ही ऑफर तिकीट जारी करण्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी लागू असेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Air india, Travel by flight

    पुढील बातम्या