मराठी बातम्या /बातम्या /मनी /

किसान क्रेडिट कार्डच्या डिजिटायझेशनला सुरुवात, शेतकऱ्यांना काय फायदा होणार?

किसान क्रेडिट कार्डच्या डिजिटायझेशनला सुरुवात, शेतकऱ्यांना काय फायदा होणार?

 किसान क्रेडिट कार्डचे डिजिटायझेशन कर्ज देण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम बनवण्यात आणि कर्जदारांचा खर्च कमी करण्यात मदत करेल.

किसान क्रेडिट कार्डचे डिजिटायझेशन कर्ज देण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम बनवण्यात आणि कर्जदारांचा खर्च कमी करण्यात मदत करेल.

किसान क्रेडिट कार्डचे डिजिटायझेशन कर्ज देण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम बनवण्यात आणि कर्जदारांचा खर्च कमी करण्यात मदत करेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 3 सप्टेंबर : भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्रामीण भागातील कर्ज प्रणालीमध्ये बदल करण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड (KCC) च्या डिजिटायझेशनचा एक पायलट प्रोजेक्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये सुरू होणार आहे. आरबीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, या पायलट प्रोजेक्टमधून मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन किसान क्रेडिट कार्ड्सच्या डिजिटायझेशनची मोहीम देशभरात सुरू केली जाईल.

मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये सुरू करण्यात आलेला पायलट प्रोजेक्ट बँकांमधील विविध प्रक्रियांचे ऑटोमेशन आणि सर्व्हिस प्रोव्हायडरच्या सिस्टमसोबत त्यांच्या सिस्टमचे एकत्रीकरण यावर लक्ष केंद्रित करेल. किसान क्रेडिट कार्डचे डिजिटायझेशन कर्ज देण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम बनवण्यात आणि कर्जदारांचा खर्च कमी करण्यात मदत करेल.

कर्जाचा कालावधी कमी होईल

याशिवाय, आरबीआयचे म्हणणे आहे की कर्जासाठी अर्ज करण्यापासून ते वितरणापर्यंत लागणारा वेळही लक्षणीयरीत्या कमी होईल. चार आठवड्यांचा हा कालावधी दोन आठवड्यांपर्यंत कमी केला जाऊ शकतो. RBI च्या मते, ग्रामीण पत हे शेतकऱ्यांच्या आर्थिक समावेशासाठी खूप महत्वाचे आहे कारण ते कृषी, संबंधित क्षेत्रे आणि संबंधित उद्योगांच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकते.

TATA ग्रुप 18 वर्षांनंतर IPO आणण्याच्या तयारीत; 'ही' कंपनी शेअर बाजारात होणार लिस्ट?

दोन राज्यांपासून सुरुवात

प्रायोगिक प्रकल्प मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमधील निवडक जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे युनियन बँक ऑफ इंडिया आणि फेडरल बँकेसह चालवला जाईल. याशिवाय राज्य सरकारेही यामध्ये पूर्ण सहकार्य करतील. KCC योजना सन 1998 मध्ये शेतकऱ्यांना सुलभ वित्तपुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, कीटकनाशके यांसारख्या कृषी उत्पादनांच्या खरेदीसाठी कर्ज दिले जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2020 मध्ये सुधारित KCC योजना सुरू केली होती, ज्यामध्ये शेतकर्‍यांना वेळेवर पतपुरवठा करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे.

Multibagger Share: सरकारी कंपनीच्या शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल! एक लाख बनले 2.65 कोटी

सर्वात स्वस्त कर्ज

KCC द्वारे, शेतकरी 5 वर्षांत 3 लाख रुपयांपर्यंतचे अल्पकालीन कर्ज घेऊ शकतात. शेतकऱ्यांना 9 टक्के दराने कर्ज मिळते. यानंतर सरकार 2 टक्के अनुदान देते. तसेच, शेतकऱ्याने वेळेवर कर्ज भरल्यास त्याला दोन टक्के अतिरिक्त सवलत दिली जाते. अशा प्रकारे, तुम्हाला कर्जावर 4 टक्के व्याज द्यावे लागेल.

First published:

Tags: Credit card, Farmer, Money