मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Digital Bank : देशात डिजिटल बँका उभारणार, कोणतीही शाखा नसणार; नीती आयोगाचा प्रस्ताव

Digital Bank : देशात डिजिटल बँका उभारणार, कोणतीही शाखा नसणार; नीती आयोगाचा प्रस्ताव

नीती आयोगाने (Niti Ayog) 'डिजिटल बँक: प्रपोजल ऑन लायसन्सिंग अँड रेग्युलेटरी सिस्टम फॉर इंडिया' या शीर्षकाच्या डिस्कशन पेपरमध्ये या संदर्भात हा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये डिजिटल बँक परवाना आणि नियामक प्रणालीबाबत आराखडा सादर करण्यात आला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 25 नोव्हेंबर : बँकांची अधिकांश कामे आता घरबसल्या होऊ लागली आहेत. इंटरनेट (Internet Service) ओळख वाढत असल्याने अनेक जण ऑनलाईन सुविधांचा (Online Service) वापर करुन बँकेत जाण्याऐवढी घरबसल्या कामे करण्याला प्राधान्य देत आहेत. हीच बाब लक्षात घेत NITI आयोगाने बुधवारी संपूर्ण तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल बँक (Digital Bank) स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. ही बँक तत्त्वतः देशातील आर्थिक आव्हानांवर मात करण्यासाठी प्रत्यक्ष शाखेऐवजी इंटरनेट आणि इतर संबंधित गोष्टींचा वापर करेल.

नीती आयोगाने (Niti Ayog) 'डिजिटल बँक: प्रपोजल ऑन लायसन्सिंग अँड रेग्युलेटरी सिस्टम फॉर इंडिया' या शीर्षकाच्या डिस्कशन पेपरमध्ये या संदर्भात हा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये डिजिटल बँक परवाना आणि नियामक प्रणालीबाबत आराखडा सादर करण्यात आला आहे. डिस्कशन पेपरमध्ये असे म्हटले आहे की डिजिटल बँक बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) मध्ये परिभाषित केल्याप्रमाणेच आहे.

डिस्कशन पेपरमध्ये म्हटलं आहे की, दुसऱ्या शब्दांत, या संस्था ठेवी घेतील, कर्ज देतील आणि बँकिंग नियमन कायद्यात प्रदान केलेल्या सर्व सेवा देतील. तसेच नावाप्रमाणेच, डिजिटल बँक मुख्यतः इंटरनेट आणि इतर संबंधित पर्यायांचा वापर भौतिक शाखेऐवजी तिच्या सेवा प्रदान करण्यासाठी करेल.

स्वस्तात घरखरेदी करण्याची संधी! या तारखेला PNB विकत आहे प्रॉपर्टी, तपासा डिटेल्स

UPI व्यवहारांच्या वाढत्या संख्येमुळे प्रोत्साहन मिळेल

चर्चा पत्रानुसार, भारतातील सार्वजनिक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, विशेषत: UPI ने हे सिद्ध केले आहे की गोष्टी डिजिटल पद्धतीने सुलभ कशा बनवता येतील. UPI द्वारे झालेल्या व्यवहारांनी मूल्याच्या बाबतीत 4 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्याचबरोबर आधार पडताळणीने 55 लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

पेट्रोल-डिझेलमुळे आजही सामान्यांच्या खिशाला चाप, काय आहे लेटेस्ट दर

NITI आयोगाचे CEO अमिताभ कांत यांनी पत्राच्या भूमिकेत लिहिले आहे की, .यात जागतिक परिस्थिती लक्षात घेत आणि त्यावर आधारित, डिजिटल बँकांना नियंत्रित संस्था म्हणून स्थापन करण्याची शिफारस करते. मिळालेल्या टिप्पण्यांच्या आधारे, चर्चा पत्राला अंतिम रूप दिले जाईल आणि NITI आयोगाच्या शिफारसी म्हणून सामायिक केले जाईल.

First published:

Tags: Digital services, बँक