मराठी बातम्या /बातम्या /मनी /EPF, GPF की PPF; कुठे गुंतवणूक केल्यास मिळेल सर्वाधिक फायदा?

EPF, GPF की PPF; कुठे गुंतवणूक केल्यास मिळेल सर्वाधिक फायदा?

गुंतवणूक केल्यास नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर एक भरभक्कम सेवानिवृत्ती निधी पुढील आयुष्यासाठी उपलब्ध होऊ शकतो.

गुंतवणूक केल्यास नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर एक भरभक्कम सेवानिवृत्ती निधी पुढील आयुष्यासाठी उपलब्ध होऊ शकतो.

गुंतवणूक केल्यास नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर एक भरभक्कम सेवानिवृत्ती निधी पुढील आयुष्यासाठी उपलब्ध होऊ शकतो.

    मुंबई 7 जुलै: कोरोना साथीमुळे (Corona Pandemic) पुन्हा एकदा लोकांना बचतीचं (Savings) महत्त्व समजलं आहे. सुरुवातीपासूनच तुम्ही योग्य गुंतवणूक योजनेत गुंतवणूक करत असाल तर निवृत्तीनंतर तुम्हाला पैशाची अडचण येणार नाही. निवृत्तीनंतरच्या आयुष्याची तरतूद करून ठेवण्यासाठी भविष्य निर्वाह निधीसारख्या बचत योजना उपलब्ध आहेत. यामध्ये गुंतवणूक केल्यास नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर एक भरभक्कम सेवानिवृत्ती निधी पुढील आयुष्यासाठी उपलब्ध होऊ शकतो.

    आपल्या देशात तीन महत्त्वाच्या भविष्य निर्वाह निधी योजना आहेत. कर्मचार्‍यांचा भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफ(EPF), सामान्य भविष्य निर्वाह निधी – जीपीएफ (GPF) आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ (PPF) अशा या तीन योजना आहेत. या योजनांविषयी काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊया.

    भारतीय Start-Ups साठी सुवर्णकाळ! 2021 च्या पहिल्या सहा महिन्यात कमावले 12.1 बिलियन डॉलर्स

    ईपीएफ : ईपीएफ ही संघटित क्षेत्रातील नोकरदारांसाठी अनिवार्य असलेली सेवानिवृत्ती बचत योजना आहे. यामध्ये कर्मचारी आणि मालक दोघेही समान योगदान देतात.

    जीपीएफ : जीपीएफ हा भविष्य निर्वाह निधी केवळ सरकारी कर्मचार्‍यांना उपलब्ध आहे.

    पीपीएफ : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ हा सर्वांसाठी उपलब्ध असून, तो सक्तीचा नाही. ही निवृत्तीच्या दृष्टीनं तयार केलेली खास योजना आहे. यामध्ये कर सवलत मिळते.

    SBI पुढील महिन्यात करणार या खात्यांचा लिलाव, वाचा कोणत्या Accounts चा आहे समावेश?

    या योजनांचे व्याज दर : सध्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ-EPFO) सदस्यांना त्यांच्या

    कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवीवर 8.50 टक्के दरानं व्याज मिळतं.

    चालू तिमाहीत जीपीएफवर (GPF) 7.1 टक्के व्याज आहे.

    पीपीएफचा (PPF) व्याज दर सध्या 7.1 टक्के आहे.

    मुदतपूर्ती कालावधी : ईपीएफ योजना सदस्य 58 वर्षांचा म्हणजे निवृत्तीच्या वयात पोहोचल्यानंतर संपते. जीपीएफची मुदत सेवा निवृत्तीनंतर पूर्ण होते. तर पीपीएफची मुदत 15 वर्षे असते.

    मुदतपूर्व समाप्ती : एखाद्या सदस्याची नोकरी काही कारणांनी आधीच संपली तर नोकरी बंद झाल्यानंतर दोन महिन्यांनंतर ईपीएफ कायमची बंद होते. तर सरकारी नोकरी गमावल्यास जीपीएफ बंद होते. मात्र पीपीएफ वैद्यकीय किंवा मुलाच्या शिक्षणाची बाब असल्यास पाच वर्षांनंतर अटी आणि शर्तीसह बंद करता येते.

    करात सूट : ईपीएफमध्ये एखाद्या व्यक्तीनं खातं सुरू केल्यानंतर पाच वर्षानी आपल्या खात्यातून उर्वरित रक्कम काढून घेतल्यास त्याला करातून सूट मिळते. जीपीएफ ही करमुक्त सेवानिवृत्ती आणि बचत योजना आहे. पीपीएफ योजनेत प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत दर वर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर कर सवलत मिळते.

    First published:
    top videos

      Tags: Investment, Money