Home /News /money /

तुम्हीही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा डाएट सल्ला ऐकत असाल तर सावध व्हा, शरीरावर होऊ शकतो घातक परिणाम

तुम्हीही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा डाएट सल्ला ऐकत असाल तर सावध व्हा, शरीरावर होऊ शकतो घातक परिणाम

खरे न्युट्रिशनल एक्सपर्ट लोकांना या आहारविषयक सल्ल्याचं पालन करताना अधिक सावध राहण्याचा सल्ला देतात, कारण प्रत्येक आहार प्रत्येकासाठी आरोग्यदायी नसतो. तसंच सोशल मीडियावरील काही सल्ले घातक असू शकतात.

मुंबई, 20 जून : हल्ली बरेच जण वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी, डाएट (Diet) करण्यासाठी सोशल मीडियावरील (Social Media) माहितीचा वापर करतात. सोशल मीडियावर तर आरोग्य विषयक सल्ले देणाऱ्या व्हिडिओंचा आणि पोस्टचा जणू पूरच आलाय. तुम्हाला अनेक प्रकारचे व्हिडिओ आणि पोस्ट सोशल मीडियावर पाहायला मिळतील. बरेच जण हे व्हिडिओ आणि पोस्टमध्ये दिलेल्या माहितीचं अनुकरण करतात. तुम्हीही असाच सल्ला शोधत असाल तर ही बातमी वाचा. कारण आज आम्ही तुम्हाला महत्त्वाची माहिती देणार आहोत.
आजकाल हेल्दी डाएटबद्दल (Healthy Diet) माहिती देणाऱ्या सोशल मीडियावरील अॅप्स, पोस्ट आणि व्हिडिओंचं प्रमाण वाढलंय. तुम्हीही आरोग्याबद्दल सल्ला घेण्याचा विचार करत असाल तर थांबा. कारण हे लोक त्या विषयातील तज्ज्ञ आहेत, याची काहीच खात्री नाही. बरेच लोक केवळ ढोबळ माहितीच्या आधारे सल्ला देतात. त्यामुळे अशा लोकांनी दिलेले सल्ले तुमच्यासाठी घातक ठरू शकतात.
खरे न्युट्रिशनल एक्सपर्ट लोकांना या आहारविषयक सल्ल्याचं पालन करताना अधिक सावध राहण्याचा सल्ला देतात, कारण प्रत्येक आहार प्रत्येकासाठी आरोग्यदायी नसतो. तसंच सोशल मीडियावरील काही सल्ले घातक असू शकतात. अलीकडेच या सर्व विषयांवर इंडिया टुडेने लाइफस्टाइल कन्सल्टंट (Lifestyle Consultant) डॉ. पल्लवी आगा यांच्याशी चर्चा केली. यावेळी पल्लवी आगा यांनी आपल्या आरोग्याला हानी पोहोचवू शकणार्‍या अशा फॅड डाएट्सच्या तोट्यांबद्दल माहिती दिली.
असे डाएट प्लॅन किती हानिकारक आहेत?
"सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर स्वतःची किंवा एखाद्या विशिष्ट ब्रँडची जाहिरात करण्यासाठी डाएट्सबद्दल मोठ्या प्रमाणावर चुकीची माहिती पसरवत आहेत. या लोकांनी दिलेली माहिती ही वैज्ञानिकदृष्ट्या चुकीची असून, यामुळे शरीरात मेटॅबॉलिक असंतुलन होतं आणि लाईफस्टाइलशी संबंधित अनेक आजार होतात," असं डॉ. पल्लवी आगा सांगतात. त्यांच्या मते ज्युसिंग, क्लोरोफिल पाणी आणि फक्त फळांचा आहार यामुळे आहारातील असंतुलन होऊन त्याचे शरीरावर घातक परिणाम होऊ शकतात.
डॉ. आगा म्हणाल्या की, विविध प्रकारच्या डाएटमुळे शरीरात विविध प्रकारचे रासायनिक आणि हॉर्मोनल असंतुलन निर्माण होतं. ज्यामुळे शरीरात प्रथिनं, चांगले फॅट आणि सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता निर्माण होते.
फॅड डाएट्समुळे शरीरावर काय वाईट परिणाम होऊ शकतात?
स्नायू कमी होणं, ऑस्टियोपोरोसिस (osteoporosis), फॅटी लिव्हर (Fatty liver), मायग्रेन (Migraine), मोठ्या आतड्यांवर परिणाम करणार आयबीएस आजार, PCOD, हॉर्मोन्स डिसबॅलेन्स, नैराश्य आणि चिंता तसेच दीर्घकाळ फॅड डाएट केल्यास मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रासही होऊ शकतो.
मानसिक आरोग्यावरही होतो परिणाम
“मानसिक आरोग्याचा (Mental Health) शारीरिक आरोग्याशी जवळचा संबंध आहे. मानसिक आरोग्यामध्ये डोकेदुखी, फायब्रोमायल्जिया, IBS, सांधेदुखी आणि वेदना, चक्कर येणं अशी अनेक शारीरिक लक्षणं असू शकतात. त्यामुळे शरीराला योग्य पोषण देणं किती महत्त्वाचं आहे, हे मानसशास्त्रातील संशोधनातून समोर येत आहे. चांगल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी घरगुती विषारी रसायनं, सौंदर्यप्रसाधनं, प्लॅस्टिक आणि जंक फूडचा वापर कमी करणं महत्त्वाचं आहे,” असंही डॉ. आगा म्हणतात.
लोक डाएटच्या सल्ल्यासाठी सोशल मीडियाकडे का वळत आहेत?
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स (Social media influencers) त्यांच्या फॉलोअर्सना त्यांच्या आकर्षक आणि मनोरंजक संवाद शैलीने भुरळ घालतात. त्यामुळे ते एखाद्या उत्पादनाचा, व्यवसायाचा किंवा खाद्यपदार्थांचा प्रचार करतात, तेव्हा त्यांचे फॉलोअर्स त्यांच्यावर विश्वास ठेवून ते फॉलो करतात असं डॉ. आगा सांगतात.
First published:

Tags: Food, Health Tips

पुढील बातम्या