Home /News /money /

मुंबई ते दिल्ली डिझेलच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या आजचे दर

मुंबई ते दिल्ली डिझेलच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या आजचे दर

मुंबईत लिटरमागे ग्राहकांना पेट्रोलसाठी 87.19 तर डिझेलसाठी 80.11 रुपये मोजावे लागणार आहेत.

    मुंबई, 26 जुलै: कोरोनाच्या महासंकटात महागाईमुळे आधीच सर्वासामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे वाढलेले भाज्या आणि किराणाचे भाव आणि महागाईचा मोठा फटका बसत असतानाच आता इंधर दरवाढीच्या झळाही बसताना दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी मुंबई आणि दिल्लीत डिझेलचे दर वाढले आहेत. मुंबईत पेट्रोल पाठोपाठ डिझेलनं ऐशी ओलांडली आहे. जुलै महिन्यात डिझेलच्या दरात आतापर्यंत 1.55 रुपयांनी वाढ झाली आहे. दिल्ली आणि मुंबईत पेट्रोलचे दर स्थिर असून डिझेलच्या दराचा मात्र भडका उडाला आहे. दिल्लीत डिझेल 80.11 तर पेट्रोल 81.79 रुपये प्रति लिटर आजचा दर आहे. तर मुंबईत लिटरमागे ग्राहकांना पेट्रोलसाठी 87.19 तर डिझेलसाठी 80.11 रुपये मोजावे लागणार आहेत. कोलकातामध्ये पेट्रोल 82.10 तर डिझेल 77.04 रुपये प्रति लिटर मोजावे लागणार आहेत.पेट्रोल डिझेलच्या भावामध्ये दररोज काहीसा बदल होत आणि दररोज त्याची समीक्षा केली जाते. सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेलचे भाव जारी करण्यात येतात. तुम्ही एसएमएसच्या माध्यमातून सुद्धा पेट्रोल आणि डिझेलचे भाव जाणून घेऊ शकता. हे वाचा-कोरोनाचा फटका! करिअर ऑप्शन म्हणून पाहिलं जाणाऱ्या क्षेत्रामध्ये नोकऱ्यांचं संकट देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. त्याच वेळी, आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. आपल्याला RSP<स्पेस> पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या