मराठी बातम्या /बातम्या /मनी /DTH वर बसलेल्या माकडाने कोणालाही मिळवून दिली महिंद्रा कार? आनंद महिंद्रांनी नावं केली जाहीर

DTH वर बसलेल्या माकडाने कोणालाही मिळवून दिली महिंद्रा कार? आनंद महिंद्रांनी नावं केली जाहीर

साधारण 88000 जणांनी आनंद महिंद्रांच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

साधारण 88000 जणांनी आनंद महिंद्रांच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

साधारण 88000 जणांनी आनंद महिंद्रांच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर :  महिंद्रा ग्रुपचे चेअरमॅन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर सक्रिय असतात. अनेकदा ते सोशल मीडियावरुन मजेशीर व्हिडीओ आणि फोटो शेअर करीत असतात. त्यांनी शनिवारी ट्विटरवर डीटीएचवर बसलेल्या माकडाचा फोटो शेअर केला होता.  हा फोटो शेअर करीत त्यांनी कॅप्शन कॉन्टेस्ट (Caption Contest) ची घोषणा केली होती. या फोटोमध्ये माकड डिश एन्टीनावर (Monkey Sitting On Dish Antenna) बसला आहे आणि तोंड उघडून हैराण झाल्यासारखं इतके तिकडे पाहतोय. हा फोटो शेअर करीत महिंद्रांनी यावर कॅप्शन सुचविण्याचं आवाहन केलं होतं. यासाठी ते विजेत्यांना स्केल मॉडेलची महिंद्रा कार देणार असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होते. अखेर आज त्यांनी विजेत्यांची नावं जाहीर केली आहेत.

आनंद महिंद्रा यांनी सोमवारी कॅप्शन कॉन्टेस्टच्या विजेत्यांची नावे सांगितली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. या विजेत्यांनी माकडाच्या फोटोला मजेशीर कॅप्शन दिले आहे. यामध्ये ट्विटर यूजर @ vallisurya1 आणि @TheSameWall यांना निवडण्यात आलं आहे. यांनी महिंद्रा कंपनीच्या ट्रकचं मॉडेल (स्केल मॉडेल) जिंकलं आहे. एका विजेत्याने कमेंटमध्ये लिहिलं आहे. - 'एक बंदर, टीवी के अंदर.' आणि दुसऱ्या विजेत्याने 'DTH- डायरेक्ट टू हनुमान.' अशा कॅप्शन दिल्या आहेत.

आनंद महिंद्रा कायम कॅप्शन स्पर्धा घेत असतात, यामध्ये ते एखादा फोटो शेअर करीत त्यावर कॅप्शन देण्याचं आवाहन करतात व त्यापैकी चांगली कॅप्शन लिहिणाऱ्या एक हिंदी व एक इंग्रजी कॅप्शनला बक्षीसही दिलं जातं.

First published:
top videos

    Tags: Tech Mahindra