मराठी बातम्या /बातम्या /मनी /बँक बुडाली तरी ठेवीदारांचे पैसे राहतील सुरक्षित; FD वर मिळेल 65 लाख रुपयांचा मोफत विमा

बँक बुडाली तरी ठेवीदारांचे पैसे राहतील सुरक्षित; FD वर मिळेल 65 लाख रुपयांचा मोफत विमा

एखादी बँकदिवाळखोरीत निघते म्हणजे थोडक्यात बुडते तेव्हा ठेवीदारांना एकच दिलासा असतो तो म्हणजे DICGC ने दिलेलं इन्श्युरन्स कव्हर अर्थात विमा संरक्षण. ते कसं मिळवायचं?

एखादी बँकदिवाळखोरीत निघते म्हणजे थोडक्यात बुडते तेव्हा ठेवीदारांना एकच दिलासा असतो तो म्हणजे DICGC ने दिलेलं इन्श्युरन्स कव्हर अर्थात विमा संरक्षण. ते कसं मिळवायचं?

एखादी बँकदिवाळखोरीत निघते म्हणजे थोडक्यात बुडते तेव्हा ठेवीदारांना एकच दिलासा असतो तो म्हणजे DICGC ने दिलेलं इन्श्युरन्स कव्हर अर्थात विमा संरक्षण. ते कसं मिळवायचं?

  नवी दिल्ली, 18 मार्च: एखादी बँक (Bank) दिवाळखोरीत निघते म्हणजे थोडक्यात बुडते तेव्हा ठेवीदारांना (Depositors) एकच दिलासा असतो तो म्हणजे डीआयसीजीसी (DICGC) अर्थात डिपॉझिट इन्श्युरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशननं दिलेलं इन्श्युरन्स कव्हर अर्थात विमा संरक्षण. 4 फेब्रुवारी 2020 पासून डीआयसीजीसीद्वारे (DICGC) देण्यात येणारं विमा संरक्षण एक लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात आलं आहे; मात्र अनेक ठेवीदारांसाठी 5 लाखांचं विमा संरक्षणदेखील अपुरं असू शकतं. यावर एक उपाय आहे तो म्हणजे हे विमा संरक्षण वाढवणं. एकाच बँकेत आणि एकाच शाखेत या विम्याची मर्यादा 65 लाखांपर्यंत वाढवता येणं शक्य आहे. ते कसं याबाबत ही माहिती

  या खात्यांवर मिळतो विमा :

  बचत खातं, मुदत ठेवी, चालू खाते, रिकरिंग डीपॉझिट (आरडी) आदी खात्यांवर विमा सुरक्षा मिळते. मात्र परदेशी सरकार, केंद्र किंवा राज्य सरकारच्या ठेवी, राज्य सहकारी बँक, राज्य भू-विकास बँक, आंतर बँक ठेवी यांना हे विमा संरक्षण मिळत नाही.

  विमा संरक्षण कसे कार्य करते?

  डीआयसीजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, एखाद्या बँकेचा परवाना रद्द झाला, तिचं विलीनीकरणाच्या किंवा पुनर्रचना झाली तर ज्या तारखेला हा बदल अस्तित्वात आला त्या दिवशीच बँकेतील प्रत्येक ठेवीदाराची मूळ ठेव रक्कम आणि त्यावरील व्याज या रकमेसाठी 5 लाख रुपयांपर्यंत विमा उतरविला जातो. याचा अर्थ असा आहे की एखाद्या बँकेत तुमची कितीही खाती असली आणि त्यात कितीही रक्कम असली तरी त्या सर्व रकमेवर केवळ 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल. या रकमेमध्ये मुद्दल आणि व्याज दोन्ही समाविष्ट आहेत. कोणत्याही उपाययोजनांनी बँक वाचली नाही आणि तिची दिवाळखोरी जाहीर करण्यात आली आणि तुमचं मूळ मुद्दल पाच लाख रुपये असेल तर ते तुम्हाला मिळेल. त्यावरचं व्याज मिळणार नाही.

  (हे वाचा:क्रेडिट कार्डाच्या अतिवापराने होते कोकेनसारखीच नशा, सर्व्हेतून धक्कादायक खुलासा)

  वेगवेगळ्या खात्यांद्वारे अतिरिक्त विमा संरक्षण :

  डीआयसीजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपण एकाच बँकेत वेगवेगळ्या हक्कांनुसार आणि क्षमतेनुसार ठेवी ठेवल्यास तुमच्या प्रत्येक ठेव रकमेवर तुम्हाला पाच लाख रुपयांचे संरक्षण मिळेल. याबाबत माहिती देताना सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आणि वित्तीय नियोजन फर्म हम फौजी इनिशिएटीव्हजचे मुख्य कार्यकारी अधिकारी निवृत्त कर्नल संजीव गोविला म्हणाले, ‘ठेवीदार एकाच बँकेत वेगवेगळ्या हक्क आणि क्षमतांमध्ये मुदत ठेवी ठेवू शकतात. सोप्या शब्दात सांगायचे तर, तुम्ही तुमचा जोडीदार, भाऊ, मुले यांच्याबरोबर संयुक्त पद्धतीनं(Joint Account) मुदत ठेवी ठेवल्यात तर या सर्व ठेवी वेगवेगळ्या हक्क आणि क्षमतांमध्ये गणल्या जातील आणि प्रत्येक खात्याला स्वतंत्रपणे 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल. या पद्धतीनं तुम्ही एकाच बँकेत एकाच शाखेत वेगवेगळ्या ठेवींना विमा संरक्षण मिळवू शकता.

  First published:

  Tags: Bank, India, Money, Rbi