• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • कोकणातील आंबा उत्पादकांचा लॉकडाऊनमध्ये फायदा, थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवला हापूस

कोकणातील आंबा उत्पादकांचा लॉकडाऊनमध्ये फायदा, थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवला हापूस

हापूसची विक्री दरवर्षी प्रमाणे मोठ्या स्तरावर झाली नसली तरी आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी नवीन मार्ग स्विकारत देशांतर्गत विक्री सुरू ठेवली आहे.

 • Share this:
  मुंबई, 31 मे : कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे (Coronavirus Lockdown) महाराष्ट्रातील परिस्थिती बिकट होत चालली आहे. यादरम्यान अनेक क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. यामुळे कोकणातील हापूसचेही (Alphonso) नुकसान झाले आहे. हापूसची विक्री दरवर्षी प्रमाणे मोठ्या स्तरावर झाली नसली तरी आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी नवीन मार्ग स्विकारत देशांतर्गत विक्री सुरू ठेवली आहे. यावेळी त्यांनी मध्यस्थांकरवी हापूस विक्री करण्याऐवजी थेट ग्राहकांपर्यंत पोहचत व्यवसाय केला आहे. सध्या 800  ते 1000 रुपये प्रति डझन दराने हापूसची विक्री केली जात आहे.  द हिंदू बिझनेस लाइनने या संदर्भात वृत्त दिले आहे. कोकणात रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे आंबा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. उत्तम प्रतीचा आंबा ही या जिल्ह्यांची ओळख आहे. साधारण मार्चमध्ये सुरू होणारा आंब्यांचा सीझन मध्य जूनपर्यंत असतो. मात्र लॉकडाऊनमुळे यावर्षी आंबा व्यवसायाला काहीशी नुकसानाची झळ पोहोचली आहे (हे वाचा-UNLOCK 1.0 : सरकारकडून नवीन गाइडलाइन जारी, वाचा कधी सुरू होणार चित्रपटगृहं) दरम्यान लॉकडाऊनच्या काळात याआधी मध्यस्थ किंवा दलालांमार्फत जी आंब्याची विक्री केली जायची त्यामध्ये खंड पडला. राज्य सरकारने शेतऱ्यांना त्यांचे उत्पादन राज्यातील इतर भागात उपभोक्त्यांपर्यंत थेट पोहोचवण्याचे आवाहन केले. याकरता सरकारने शेतकऱ्यांना विशेष पास देखील देऊ केले आहेत. सरासरी 100 आंब्यांच्या झाडांच्या शेतीसाठी शेतकऱ्याकडून साधारण 1 ते 1.25 लाख खर्च केला जातो. तर प्रत्येक 100 झाडांमधून शेतकऱ्यांना वार्षिक 8 लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळते. मात्र आता मध्यस्थांचे कमिशन कमी झाल्यामुळे फायदा आणखी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. साधारण 10 लाखांपर्यंतचा फायदा होऊ शकतो. त्याचप्रमाणे उपभोक्त्यांना देखील आधीच्या तुलनेत स्वस्त दरात आंबे उपलब्ध होत आहेत. (हे वाचा-रिलायन्स समूहातील 'आलोक इंडस्ट्रीज' तयार करणार PPE, 650 रुपयांना मिळणार किट)
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: