Home /News /money /

आधार अपडेट करण्यासाठी UIDAIने दिली नवी माहिती, आता याकरता बँकेत जाण्याची गरज नाही

आधार अपडेट करण्यासाठी UIDAIने दिली नवी माहिती, आता याकरता बँकेत जाण्याची गरज नाही

आधार अपडेट करणाऱ्यासाठी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आता कॉमन सर्व्हिस सेंटर्सच्या (CSC) माध्यमातून देखील आधार अपडेट करता येईल.

    नवी दिल्ली, 29 एप्रिल :  आधार अपडेट करणाऱ्यासाठी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आता कॉमन सर्व्हिस सेंटर्सच्या (CSC) माध्यमातून देखील आधार अपडेट करता येईल. UIDAI ने जवळपास 20 हजार कॉमन सर्व्हिस सेंटर्सना आधार अपडेट करण्याची परवानगी दिली आहे. याआधी हे काम बँकिंग करस्पॉन्डंट कडून केले जात होते. या सर्व सेंटर्सवर आधार अपडेट करण्यासाठी सिस्टम तयार केली जात आहे. डेमोग्राफिक अपडेटची सुविधा मिळेल UIDAI  ने सोमवारी अशी माहिती दिली की आता कॉमन सर्व्हिस सेंटर्सच्या माध्यमातून सुद्धा आधार अपडेट करता येईल. UIDAIने CSCच्या ई-प्रशासन सेवेचे सीईओ दिनेश त्यागी यांना लिहलेल्या पत्रामध्ये अशी माहिती दिली आहे की, या सेंटर्सना केवळ डेमोग्राफिक अपडेटची (Demographic Data in Aadhaar) परवानगी देण्यात येत आहे. (हे वाचा-लॉकडाऊननंतर विमान प्रवास करायचा आहे? दाखवावं लागणार मेडिकल सर्टिफेकेट) सेंटर संचालक आणि आधार युजर्सची ओळख बोटांचे ठसे आणि डोळ्यांच्या माध्यमातून केली जाईल. जून अखेरपर्यंत सुरू होणार सेवा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद आणि आयटी राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी सोशल मीडियावरून यासंदर्भात माहिती दिली आहे. रविशंकर प्रसाद म्हणाले की, सीएससीच्या ऑपरेटर्सने UIDAIच्या नियमांप्रमाणे योग्य काम करावं. त्याचप्रमाणे ते पुढे म्हणाले की, माझ्या विश्वास आहे की या सुविधेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या घराजवळ असणाऱ्या सेंटरवर जाऊन आधारची सेवा उपलब्घ करून घेता येईल.' संपादन- जान्हवी भाटकर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Aadhar card, UIDAI

    पुढील बातम्या