Home /News /money /

Stock Market Trading साठी KYC अनिवार्य; अन्यथा डिमॅट आणि ट्रेंडिंग अकाऊंट बंद होणार

Stock Market Trading साठी KYC अनिवार्य; अन्यथा डिमॅट आणि ट्रेंडिंग अकाऊंट बंद होणार

शेअर बाजाराचे काम पारदर्शक व्हावे आणि शेअर होल्डिंगची संपूर्ण माहिती मिळावी यासाठी केवायसीवर भर देण्यात येत आहे. KYC सह, सेबीकडे शेअर खरेदी आणि विक्रीचे संपूर्ण खाते असेल. यामुळे करचुकवेगिरीलाही आळा बसेल.

    मुंबई, 25 जानेवारी : तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग (share market trading) करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. तुम्हाला तुमच्या डीमॅट आणि ट्रेडिंग खात्याचे (demat account opening) KYC करावे लागेल. अन्यथा, तुमचे खाते बंद केले जाईल आणि तुम्ही शेअर बाजारात ट्रेडिंग करू शकणार नाही. 1 जून 2021 नंतर उघडलेल्या सर्व खात्यांसाठी तपशील देणे अनिवार्य करण्यात आले आहे. केवायसी अपडेट (KYC Update) करण्यासाठी गुंतवणूकदारांना 31 मार्च 2022 पर्यंत वेळ देण्यात आला आहे. ही माहिती अपडेट न केल्यास तुमचे डीमॅट खाते निष्क्रिय केले जाईल. त्यानंतर ही माहिती अपडेट केल्यानंतरच ती पुन्हा अॅक्टिव्ह होईल. केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करावी NSDL नुसार, डिमॅट आणि ट्रेडिंग खाती असणार्‍या गुंतवणूकदारांना KYC प्रक्रियेचे 6 तपशील देणे आवश्यक आहे. यामध्ये नाव, पत्ता, पॅन तपशील, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी आणि वार्षिक उत्पन्न यांचा समावेश आहे. डिमॅट खातेधारकाने उत्पन्न, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी अपडेट न केल्यास त्याचे खाते निष्क्रिय केले जाईल. शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 17.5 लाख कोटींचं नुकसान खात्यात असलेल्या शेअर्सचे काय होणार? खाते निष्क्रिय केल्यावर, तुमच्याकडे असलेले शेअर्स किंवा पोर्टफोलिओ खात्यात राहतील. परंतु, तुम्ही कोणत्याही नवीन प्रकारची खरेदी आणि विक्री करू शकणार नाही. केवायसी तपशील अपडेट केल्यावरच हे खाते पुन्हा अॅक्टिव्ह केले जाईल. CDSL आणि NDSL ने यापूर्वीच यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. शेअर बाजारातील कल कोरोनाच्या काळात गुंतवणूकदारांचा शेअर बाजाराकडे कल वाढला आहे. NSE च्या ताज्या आकडेवारीने याची पुष्टी केली आहे. NSE च्या मते, चालू आर्थिक वर्षात चार महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 50 लाखांहून अधिक नवीन गुंतवणूकदारांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर नोंदणी केली आहे. Paytm, Zomato शेअर्समध्ये मोठी घसरण, लिस्टिंगनंतरच्या नीच्चांकी पातळीवर, काय आहे कारण? शेअर बाजाराचे काम पारदर्शक व्हावे आणि शेअर होल्डिंगची संपूर्ण माहिती मिळावी यासाठी केवायसीवर भर देण्यात येत आहे. KYC सह, सेबीकडे शेअर खरेदी आणि विक्रीचे संपूर्ण खाते असेल. यामुळे करचुकवेगिरीलाही आळा बसेल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या