मराठी बातम्या /बातम्या /मनी /

व्यावसायिकांची निर्मला सीतारामन यांना साद, ITR भरण्याची तारीख पुढे ढकलण्याची मागणी

व्यावसायिकांची निर्मला सीतारामन यांना साद, ITR भरण्याची तारीख पुढे ढकलण्याची मागणी

CAIT ने आयकरमध्ये आडिट रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2020 पासून पुढे तीन महिने वाढवली जावी अशी मागणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे.

CAIT ने आयकरमध्ये आडिट रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2020 पासून पुढे तीन महिने वाढवली जावी अशी मागणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे.

CAIT ने आयकरमध्ये आडिट रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2020 पासून पुढे तीन महिने वाढवली जावी अशी मागणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे.

    नवी दिल्ली, 26 डिसेंबर: देशातील 7 कोटींपेक्षा जास्त उद्योजक आणि व्यावसायिकांची संघटना असणाऱ्या कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स ( CAIT ) ने आयकरामध्ये ऑडिट रिटर्न फाइल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2020 पासून पुढे तीन महिने वाढवण्याची मागणी केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे. या व्यावसायिकांचं असं म्हणणं आहे की, कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे त्यांना गेल्या काही महिन्यांपासून मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे आणि आर्थिक व्यवहार आता कुठे रुळावर येऊ लागले आहेत. अशावेळी आता व्यावसायिक रिटर्न भरण्यात गुंतले तर बाकी कामासाठी त्यांना नुकसान सहन करावं लागेल. याकरता या व्यावसायिकांच्या संंघटनेने रिटर्न भरण्याची तारीख वाढवण्याची मागणी केली आहे. याशिवाय CAIT ने जीएसटी नियमात कलम 86-B जोडण्यास विरोध दर्शवला आहे. या कलमाअंतर्गत ज्या व्यापाऱ्यांचा मासिक टर्नओव्हर 50 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना 1 टक्के जीएसटीची रक्कम रोख भरावी लागणार आहे. सरकारने बनावट बिल्सच्या माध्यमातून करचोरी रोखण्यासाठी हा उपाय केला आहे. मात्र व्यावसायिकांनी हा उपाय मागे घेण्याची मागणी सरकारकडे केली आहे आणि सरकारच्या या निर्णयाबाबत नाराजीही व्यक्त केली आहे. (हे वाचा-सरकारी बँकांपेक्षा खाजगी क्षेत्रातील या छोट्या बँकांमध्ये FD वर व्याजदर अधिक) CAIT ने अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांना पत्र लिहून मागणी केली आहे की हा नियम त्वरित स्थगित केला जावा. त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांशी बातचित केल्यानंतरच हा नियम लागू करण्यात यावा. तसंच जीएसटी आणि आयटी रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबरवरून 3 महिने पुढे वाढवण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. (हे वाचा-आठवड्याला 97 कोटी होती कमाई,पण एवढ्याच किंमतीला विकली Michael Jacksonची संपत्ती) CAIT चे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतिया आणि राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी निर्मला सीतारामन यांना पाठवलेल्या पत्रात असं देखील म्हटलं आहे की, आता वेळ आली आहे की सरकारने व्यापाऱ्यांंबरोबर बैठक करून आतापर्यंतच्या जीएसटी कर प्रणालीचा संपूर्ण आढावा घेतला पाहिजे आणि करमर्यादा कशी वाढवली पाहिजे तसंच राज्यांच्या महसुलात कशाप्रकारे वाढ केली पाहिजे, यावर चर्चा केली पाहिजे. कॅटने या मुद्द्याबाबत निर्मला सीतारामन यांच्याकडे  भेटीसाठी वेळ मागितली आहे. आयकर विभागाने केलेल्या ट्वीटनुसार 25 डिसेंबर या दिवसात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 5 लाख 82 हजार 988 टॅक्सपेयर्सनी रिटर्न दाखल केला आहे.  आयकर विभागाच्या मते 24 डिसेंबर 2020 पर्यंत 3.97 कोटी करदात्यांनी असेसमेंट इयर 2020-21 साठी आयटीआर (Income Tax Return) दाखल केला आहे. ITR दाखल करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 आहे. कोरोना पँडेमिकमुळे करदात्यांसाठी 31 डिसेंबरपर्यंत ही तारीख वाढवण्यात आली होती. गेल्यावर्षी आयटी रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2019 होती. (हे वाचा-तुम्ही ITR फाइल केला का? ही आहे शेवटची तारीख, 3.97 कोटी करदात्यांनी भरला रिटर्न) व्यक्तिगत करदात्यांसाठी AY 2020-21 साठी 31 डिसेंबर 2020 ही शेवटची तारीख आहे. मात्र ज्या लोकांच्या खात्यासाठी ऑडिट आवश्यक आहे, त्यांच्यासाठी रिटर्न दाखल करण्याची तारीख 31 जानेवारी 2021 आहे. ITR भरण्याची तारीख कोरोनामुळे 31 जुलैवरून 31 ऑक्टोबर 2020 करण्यात आली होती. त्यानंतर ही तारीख 31 डिसेंबर करण्यात आली आहे. तुम्हाला ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने आयटीआर फाइल करता येईल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Money, Nirmala Sitharaman

    पुढील बातम्या