नवी दिल्ली, 10 मे : कोरोनाच्या (Corona) संकटकाळात 2020 मध्ये सोन्यातील (Gold) गुंतवणुकीने (Investment) गुंतवणूकदारांना चांगला फायदा मिळाला. सोन्याचे दर 7 आॅगस्ट 2020 ला एमसीएक्सवर (MCX) 55,992 रुपये प्रति 10 ग्रॅम या उच्चांकी दरावर बंद झाले. तेव्हापासून आतापर्यंत सोन्याच्या दरात 9000 रुपयांनी घट झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) आणि लग्न हंगाम (Wedding Season) यामुळे सोन्याच्या दरात (Gold Price) पुन्हा एकदा तेजी येऊ लागली आहे. एमसीएक्सवर आज सोन्याचे दर 0.16 टक्के तेजीसह 47,670 रुपये प्रति 10 ग्रॅम वर पोहोचले. चांदीच्या दरात 0.26 टक्क्यांनी वाढ होत, दर 72,000 किलोग्रॅम वर पोहोचले.
त्यामुळे आपल्या जवळील सोन्याची विक्री करावी की करु नये, अशी व्दिधा मनःस्थिती सध्या गुंतवणूकदारांची झाली आहे. यावर तज्ज्ञ काय म्हणतात, ते जाणून घेऊया...
गत 1 वर्षात मिळाला 17 टक्के रिटर्न
गतवर्षी म्हणजेच मार्च 2020 मध्ये सोने 38,800 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. हेच दर आता 45,000 रुपयांवर पोहोचले आहेत. याचाच अर्थ गत 1 वर्षात सोन्याने सुमारे 17 टक्के रिटर्न दिला आहे. गत 5 वर्षांचा विचार करता सोन्यातून 61 टक्के रिटर्न मिळाला आहे. मार्च 2016मध्ये सोन्याचे दर 28,000 प्रति 10 ग्रॅम होते.
सोन्यात गुंतवणूक करणं योग्य आहे का?
सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाची दुसरी लाट आणि लग्न समारंभाचा हंगाम यामुळे सोन्याला मागणी वाढत आहे. यामुळे येत्या वर्षा अखेरपर्यंत सोन्याचे दर पुन्हा 52,000 रुपयांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. अनुज गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, जर कोणी गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक (Investment) करु इच्छित असेल तर हीच वेळ योग्य आहे. जर सोन्याची मागणी 20 टक्क्यांनी वाढली तर सोन्याच्या दरात 1000 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढ होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात होऊ शकते वाढ
आयआयएफएल (IIFL) सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष (कमोडिटी अॅण्ड करन्सी) अनुज गुप्ता याबाबत म्हणाले की कोरोनामुळे आॅगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर 56,000 रुपयांवर पोहोचले होते. आता देशात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आहे. तसेच लग्न समारंभांचा हंगाम सुरु झाला आहे. यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं दिसून येतं. तसेच मे महिन्यात अक्षय तृतीया (Akshaya Tritiya) हा सण देखील आहे. यामुळे देखील सोन्याची मागणी आणि दर वाढू शकतात.
हे ही वाचा-उच्च न्यायालयाचा ज्वेलर्सना दिलासा; अनिवार्य हॉलमार्किंग नसली तरी कारवाई टळली
आॅनलाईन विक्री घटली
भारतात सोने विक्रीसाठी अक्षय तृतीया आणि गुढीपाडवा हे शुभ दिवस मानले जातात. मात्र यंदा सलग दुसऱ्या वर्षी दुकानं बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्वेलर्स काहीसे नाराज आहेत. कारण मागील वर्षी देखील याच कालावधीत दुकानं बंद होती. एएनएमओएल (ANMOL) चे संस्थापक ईशू दतवानी यांच्या म्हणण्यानुसार, यावेळी बहुतांश दागिने विक्रेत्यांची उलाढाल 70 टक्क्यांहून अधिक प्रमाणात घटली आहे.
या कारणास्तव अक्षय तृतीयेला केली जाते सोने खरेदी
ज्योतिष ग्रह आणि नक्षत्रांनुसार, अक्षय तृतीयेला सोनं खरेदी केल्यास व्यक्तीच्या जीवनात सुख समृध्दी येते. तसेच सोन्याची तुलना सूर्यासोबत केली जाते. अक्षय तृतीयेला सूर्य सर्वाधिक तेजस्वी असतो. सोने खरेदी ही शक्ती आणि ताकदीचं प्रतिक मानलं जातं. सोन्याला नेहमीच बहुमूल्य धातू आणि धन समृद्धीचे प्रतीक मानलं गेलं आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेला सोनं खरेदी शुभ मानली जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Investment