सोनं कडाडण्याची शक्यता, प्रति तोळे असेल 'इतका' भाव

सोनं कडाडण्याची शक्यता, प्रति तोळे असेल 'इतका' भाव

Gold, Silver - आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढल्यानं सोनं महाग होण्याची शक्यता निर्माण झालीय

  • Share this:

मुंबई, 19 जुलै : तुम्ही सोनं खरेदी करायचा प्लॅन करत असाल तर आज ( 19 जुलै ) थोडं थांबा. कारण आज सोन्याचा भाव सर्वाधिक होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढल्यानं सोनं चांगलंच महाग होण्याची चिन्ह दिसतायत. आज साधारण ३६ हजाराच्या आसपास सोनं प्रति तोळे भाव जाण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षातला हा सर्वात जास्त भाव आहे.

सुरुवातीलाच सोन्यानं  35409 रुपयांचा वरचा स्तर गाठलाय. आंतरराष्ट्रीय बाजारात सहा वर्षातली ही सर्वात जास्त वृद्धी आहे. जानेवारीपासून आतापर्यंत सोन्यात 13 टक्के तेजी आलीय.

एजंट स्मिथपासून राहा सावधान, नाही तर एका झटक्यात रिकामं होईल बँक अकाउंट

काल ( 18 जुलै ) सोन्याचा भाव वाढला होता. तो 170 रुपयांनी वाढून 35,670 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर चांदी 910 रुपयांनी वाढून 41,100 रुपये प्रति ग्रॅम झाली.

दिल्लीत 99.9 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 170 रुपयांनी वाढून ती 35,670 रुपये झाली. तर 99.5 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 35,500 रुपये झाली. 8 ग्रॅमची गिन्नी 27,400 रुपये आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरात दिलासा, 'या' 3 प्रकारे तुम्हीही पाहू शकता रोजच्या किमती

काल चांदी 910 रुपयांनी वाढून 41,100 रुपये प्रति ग्रॅम झाली. साप्ताहिक बिकवाली चांदी 1,009 रुपये वाढून 40,406 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिर राहिली. चांदीचा सिक्का लिवाली आणि बिकवाली क्रमश: 81 हजार आणि 82 हजार रुपये प्रति शेकडा कायम आहे.

ICCने सचिनला Hall Of Fameमध्ये स्थान देण्यास केला उशीर? 'हे' आहे कारण

बजेटमध्ये सोन्याच्या आयातीवरचे दर वाढण्याची घोषणा झालीय. तेव्हापासून दोन दिवस सोन्याच्या भावात वाढ झाल्यानंतर बजेटनंतर लगेचंच सोनं 35470 रुपये प्रति 10 ग्रॅम राहिलं होतं. बजेटमध्ये सरकारनं सोनं आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या सीमा शुल्कात 10 टक्क्यांवरून 12.5 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर सोन्यात 670 रुपयांनी वाढ होऊन 35,470 रुपये प्रति 10 ग्रॅमवर सोनं पोचलं.  बजेटच्या दिवशी सोनं 590 रुपयांनी वाढलं होतं. शनिवारी चांदीत 300 रुपयांनी वृद्धी होऊन 38,800 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती.

खोटी घरभाडे पावती दाखवाल तर होणार ही कारवाई; इतर टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: gold
First Published: Jul 19, 2019 02:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading