वर्षभर 'या' उत्पादनांना असते मागणी, फक्त 90 हजार रुपयात सुरू करा व्यवसाय

वर्षभर 'या' उत्पादनांना असते मागणी, फक्त 90 हजार रुपयात सुरू करा व्यवसाय

हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर सरकार मुद्रा स्कीमच्या अंतर्गत कर्जही देतं.

  • Share this:

मुंबई, 10 जून : बेकरी प्राॅडक्ट आणि स्नॅक्सची मागणी पूर्ण वर्षभर असते. केक, ब्रेड आणि चिप्स बनवण्याचं युनिट सुरू केलं तर त्यात नक्कीच फायदा आहे. हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर सरकार मुद्रा स्कीमच्या अंतर्गत कर्जही देतं. या व्यवसायात वर्किंग कॅपिटल जवळजवळ 1.86 लाख रुपये लागेल. यात कच्चा माल म्हणजे पिठ, मैदा, बटाटा, दूध, तूप, साखर, यिस्ट, मीठ, फ्लेवर पावडर आणि खाण्याचे रंग इतके पदार्थ लागतील. हे सर्व पदार्थ बाजारात सहज मिळतील.

तुम्हाला 90 हजार रुपये गुंतवावे लागतील

खेळतं भांडवल म्हणजेच वर्किंग कॅपिटलमध्ये काम करणाऱ्यांचे पगार, पॅकिंग, टेलिफोन, भाडं असे खर्च येतील. त्यानंतर फिक्स्ड भांडवल लागेल. ते जवळजवळ असेल 3.5 लाख रुपये. त्यात मशीन्स आणि इतर साधनं येतील.

ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड काळाच्या पडद्याआड

भाविकांवर काळाचा घाला, बस अपघातात 11 जणांचा मृत्यू

एकूण खर्च जवळजवळ 5.36 लाख रुपये होईल. यासाठी तुम्हाला तुमच्या खिशातून 90 हजार रुपये काढावे लागतील. बँकेकडून 2.97 लाख रुपयाचं टर्म लोन आणि 1.49 लाख रुपयांचं वर्किंग कॅपिटल कर्ज मिळू शकतं.

धक्कादायक! चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार

अशी होईल कमाई

तुम्ही दर महिन्याला 1.86 लाख रुपये वर्किंग कॅपिटलसोबत उत्पादन सुरू केलंत तर वर्षभरात एकूण 20.38 लाख रुपयांची विक्री होईल. उत्पादनाचा वर्षाला खर्च 14.26 लाख रुपयापर्यंत असेल. टर्म लोन आणि वर्किंग कॅपिटल कर्जाचं वर्षाला व्याज जवळजवळ 50 हजार रुपये द्यावे लागतील. इन्कम टॅक्स जवळजवळ 13 हजार रुपये, छोटे मोठे खर्च 70 हजार रुपये. वर्षाला एकूण नफा 4.60 लाख रुपये, म्हणजे दर महिन्याला जवळजवळ 38 हजार रुपये. वर्षाला 78 टक्के रिटर्नमधून दीड वर्षात तुमची सगळी गुंतवणूक परत मिळेल.


VIDEO : मुंबईच्या रस्त्यावर स्टंट करत मद्यपींचा धुमाकूळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 10, 2019 12:06 PM IST

ताज्या बातम्या