मराठी बातम्या /बातम्या /मनी /

लस घेतली नसेल तर पगारातून कापले जाणार दरमहा 15000 रुपये; या कंपनीचा मोठा निर्णय

लस घेतली नसेल तर पगारातून कापले जाणार दरमहा 15000 रुपये; या कंपनीचा मोठा निर्णय

डेल्टा एअर लाइन्सने (Delta Air Lines) कोव्हिड-19 व्हॅक्सिन (Covid-19 Vaccine) न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे.

डेल्टा एअर लाइन्सने (Delta Air Lines) कोव्हिड-19 व्हॅक्सिन (Covid-19 Vaccine) न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे.

डेल्टा एअर लाइन्सने (Delta Air Lines) कोव्हिड-19 व्हॅक्सिन (Covid-19 Vaccine) न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे.

    नवी दिल्ली, 26 ऑगस्ट: कोरोना काळात अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमला पसंती दिली आहे. मात्र ज्याठिकाणी वर्क फ्रॉम होम शक्य नाही आहे, त्याठिकाणी कोरोनाविषयक निर्बंध कठोर करून कंपन्यांनी संबंधित कामं सुरू केली आहेत. डेल्टा एअर लाइन्सने (Delta Air Lines) त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना लशीचे दोन्ही डोस घेणं अनिवार्य असणार आहे. CNBC ने दिलेल्या वृत्तानुसार व्हॅक्सिन (Covid-19 Vaccine) न घेतल्यास कर्मचाऱ्यांना हेल्थ इन्शुरन्सवर दरमहा 15 हजार रुपये सरचार्ज आकारण्याची घोषणा केली आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. 1 नोव्हेंबरपासून हा नियम लागू होणार आहे. कंपनीने केली ही घोषणा अटलांटा बेस्ड या एअरलाइन्सचे सीईओ एड बास्टियन यांनी अशी माहिती दिली आहे की, जर त्यांनी लस घेतली नसेल तर 1 नोव्हेंबरपासून कर्मचाऱ्यांना त्यांच्या हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमवर $200 (साधारण 14,831 रुपये) अधिकचा चार्ज द्यावा लागेल. त्यांनी अशी माहिती दिली की अलीकडच्या आठवड्यात कोरोनामुळे रुग्णालयात भरती असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही. बास्टियन यांनी दिलेल्या माहितीनुसार कोव्हिड-19 च्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये येणारा खर्च जवळपास 50 हजार डॉलर आहे. हे वाचा-सरकारकडून शिक्षकांच्या लसीकरणाची घाई, राज्यांना दिलं 5 सप्टेंबरचं टार्गेट एअरलाइनकडून बुधवारी अशीही माहिती देण्यात आली आहे की, कंपनी 12 सप्टेंबरपासून दर आठवड्याला टेस्टिंग करणार आहे. याशिवाय मास्क वापरणे प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी बंधनकारक असेल. डेल्टा एअरलाइन्सच्या सीईओंनी अशी माहिती दिली की कंपनीतील 75 टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जुलैच्या मध्यापर्यंत 72 टक्के लसीकरण झालं होतं, उर्वरित कर्मचाऱ्यांचे लसीकरण देखील लवकर पूर्ण केले जाणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवरही संकट यूनायडेट एअरलाइन्सने असे म्हटले आहे की 27 सप्टेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांनी लस घेणे आवश्यक असेल. 27 सप्टेंबरनंतर कंपनीने कारवाई केल्यास कर्मचाऱ्यांना नोकरी देखील गमवाली लागू शकते.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Corona vaccine, Coronavirus

    पुढील बातम्या