अंडरवेअर्सची विक्री घटली आणि डेटिंग मात्र वाढलं, हे आहे आर्थिक मंदीचं कनेक्शन!

अंडरवेअर्सची विक्री घटली आणि डेटिंग मात्र वाढलं, हे आहे आर्थिक मंदीचं कनेक्शन!

जगभरात पुरुषांच्या अंडरवेअरची विक्री आणि आर्थिक मंदीचा मुद्दा चर्चेत आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार, चार मोठ्या अंडरवेअर कंपन्यांच्या विक्रीत घट झाली आहे. ही घटलेली विक्री आणि आर्थिक मंदी यांचा गाढा संबंध आहे.

  • Share this:

मुंबई, 17 ऑगस्ट : जगभरात पुरुषांच्या अंडरवेअरची विक्री आणि आर्थिक मंदीचा मुद्दा चर्चेत आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार, चार मोठ्या अंडरवेअर कंपन्यांच्या विक्रीत घट झाली आहे. गेल्या 10 वर्षांत या कंपन्यांच्या नफ्यामध्ये एवढी घसरण कधीच झाली नव्हती. ही घटलेली विक्री आणि आर्थिक मंदी यांचा गाढा संबंध आहे.

अमेरिकेमधल्या सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हचे माजी अध्यक्ष अ‍ॅलन ग्रीनस्पॅन यांनी अंडरवेअरच्या विक्रीबदद्ल एक निर्देशांक तयार केला आहे. याला मेन्स अंडरवेअर इंडेक्स असं म्हणतात. या इंडेक्सवर नजर टाकली तर आर्थिक मंदीचे संकेत मिळतात.

जियोजित फायनान्शिअलचे वरिष्ठ अध्यक्ष गौरांग शाह यांच्या मते, मेन्स अंडरवेअर इंडेक्सवरून आर्थिक मंदीची चिन्हं दिसत आहेत. यामध्ये विक्रीत मोठ्या प्रमाणात घट दिसत आहे.

याच 'मेन्स अंडरवेयर इंडेक्स' वरून 1990, 2001 आणि 2007 च्या अमेरिकेतल्या मंदीबद्दल माहिती मिळू शकली होती. आर्थिक मंदी असते तेव्हा खर्चातही कपात होते. मंदीच्या काळात पालक लहान मुलांचे डायपर्स कमी वेळा बदलतात आणि त्यामुळे मुलांना त्वचेचे विकार होतात. मग डायपर रॅश क्रीमची विक्री वाढते आणि डायपर्सची कमी होते.

केळी,अंड्यांच्या बिलांची सरकारने घेतली दखल,हॉटेलांवर होणार कारवाई

मेन्स अंडरवेअर इंडेक्सप्रमाणेच डेटिंग इंडिकेटरचीही चर्चा जोरात आहे. अमेरिकेमधल्या Match.com या डेटिंग साइटच्या म्हणण्यानुसार, जेव्हा कंपन्या अडचणीत असतात त्यावेळी या कंपन्यांमधल्या कर्मचाऱ्यांचं डेटिंगचं प्रमाण वाढतं. माणसं आपलं दु:ख विसरण्यासाठी किंवा कुणाशीतरी बोलण्यासाठी डेटिंग साइटचा वापर करतात, असं लक्षात आलं आहे.

याआधी 2008 मध्ये डेटिंग साइटवर बऱ्याच नोंदी होत होत्या. 2001 मध्येही वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या हल्ल्यानंतर Match.com या डेटिंग साइटला जास्त मागणी होती.

मेन्स अंडरवेअरची विक्री घटण्याचा असाच पॅटर्न सुरू राहिला तर आर्थिक मंदीची चिन्हं आहेत. जगभरात आधीच वाढती बेरोजगारी आणि नोकऱ्या जाण्याचं प्रमाण यामुळे लोक चिंतेत आहेत. त्यातच आर्थिक मंदीचा गंभीर इशारा आला आहे.

========================================================================================

SPECIAL REPORT: अक्षयकुमारच्या 'मिशन मंगल'वर का लागला 'अँटी हिंदू'चा ठपका?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 17, 2019 04:08 PM IST

ताज्या बातम्या