मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Debit Card : डेबिट कार्ड फ्रॉड वाढलेत; 'या' सेफ्टी टिप्स फॉलो करा, आर्थिक संकट टाळा

Debit Card : डेबिट कार्ड फ्रॉड वाढलेत; 'या' सेफ्टी टिप्स फॉलो करा, आर्थिक संकट टाळा

बँक कोणत्याही सेवेसाठी तुमचा पिन मागत नाही. कॉलवर एकापेक्षा जास्त लोकांनी तुमचा पिन मागितल्यास ताबडतोब सावध व्हा. कदाचित तो बँक अधिकारी नसून फसवणूक करणारा असेल.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 26 डिसेंबर : जर तुमचे बँक खाते असेल तर त्याच्यासोबत तुम्हाला एक डेबिट कार्ड देखील मिळाले असेल. लोक अनेक आर्थिक सेवांसाठी डेबिट कार्ड वापरतात. याद्वारे तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकता. डेबिट कार्डचा वापर पीओएस मशीनद्वारे पेमेंटसाठी केला जातो. त्याच वेळी, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन शॉपिंग, बिल पेमेंटसह इतर अनेक कामांसाठी देखील डेबिड कार्डची आवश्यकता आहे.

कार्ड वापरताना सतर्क राहा

डेबिट कार्ड ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी ऑथेन्टिकेशन प्रोसेससह येतात. पण हॅकर्स कार्डधारकांचे कार्ड आणि गोपनीय माहिती मिळवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतात. त्यामुळे डेबिट कार्डधारकांनी ते वापरताना नेहमी काळजी घ्यावी. डेबिट कार्ड वापरताना येथे काही सुरक्षितता टिप्स आहेत. त्या देखील तुम्ही फॉलो करू शकता.

31 डिसेंबरआधी 'हे' काम करुन घ्या, अन्यथा सीज होईल बँक अकाऊंट

तुमचा CVV, PIN डेटा चोरीपासून संरक्षित करा

डेबिट कार्ड वापरासाठी सर्वात महत्वाची गोपनीय माहिती म्हणजे पिन. तुमचा पिन कधीही फोनवर किंवा कागदावर सेव्ह करू नका. हे लक्षात ठेवणे चांगले राहिल. बँक कोणत्याही सेवेसाठी तुमचा पिन मागत नाही. कॉलवर एकापेक्षा जास्त लोकांनी तुमचा पिन मागितल्यास ताबडतोब सावध व्हा. कदाचित तो बँक अधिकारी नसून फसवणूक करणारा असेल. त्याच वेळी, डेबिट कार्डचे CVV देखील खूप महत्वाचे आहे. हे ऑनलाइन ट्रान्सफरसाठी वापरले जाते. CVV आणि PIN कधीही कोणाशीही शेअर करू नका.

WhatsApp देणार नजीकच्या स्टोअर्स, रेस्टॉरंट्सची माहिती; कसं आहे नवीन फीचर?

मंथली स्टेटमेंटवर लक्ष ठेवा

आजकाल हॅकर्स एकाच खात्यातून मोठ्या रकमेऐवजी अनेक खात्यांमधून लहान रक्कम काढतात. अशा प्रकारे फसवणूक झाल्यास त्वरित इशारा मिळत नाही. परिणामी गुंडांच्या कारवाया लगेच कोणाच्याही लक्षात येत नाहीत. तुम्हाला तुमच्या स्टेटमेंटमध्ये कोणताही अनोळखी व्यवहार दिसल्यास ताबडतोब बँकेला कळवा. हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या कार्डांसाठीही ही पद्धत अवलंबा. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर बँकेकडून आलेल्या संदेशांवर लक्ष ठेवा. तुम्ही न केलेल्या व्यवहाराबाबत तुम्हाला संदेश मिळाल्यास, ताबडतोब बँकेशी संपर्क साधा.

First published:

Tags: Investment, Money, Share market