Home /News /money /

PAN-Aadhar लिंक नसणाऱ्यांसाठी मोठा दिलासा, सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय?

PAN-Aadhar लिंक नसणाऱ्यांसाठी मोठा दिलासा, सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय?

PAN-Aadhar Card Linking Deadline: ज्यांनी पॅन आणि आधार अद्याप लिंक (PAN-Aadhar Card Link) केलेलं नाही, त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. सरकारी आदेशानुसार पॅन-आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख 30 जून आहे, मात्र ही डेडलाइन वाढू शकते.

पुढे वाचा ...
     नवी दिल्ली, 25 जून: ज्यांनी पॅन आणि आधार अद्याप लिंक (PAN-Aadhar Card Link) केलेलं नाही, त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. सरकारी आदेशानुसार पॅन-आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख 30 जून आहे, मात्र ही डेडलाइन वाढू शकते. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता ही तारीख आणखी 2 ते 3 महिन्यांनी वाढण्याची शक्यता आहे. सध्या देशभरात जवळपास 70 टक्के लोकांनी पॅन-आधार कार्ड लिंक केलं आहे. गेल्या महिन्यापर्यंत पॅनकार्डधारकांची संख्या 55.82 कोटी आहे. यापैकी 16.25 कोटींनी त्यांचे PAN आधारशी लिंक केलेले नाही. अर्थात 30 टक्के जणांनी अद्याप पॅन-आधार लिंक केलेलं नाही. कोरोनामुळे पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम तारीख (Deadline to Link PAN and Aadhar Card) 30 सप्टेंबरपर्यंत वाढू शकते. आतापर्यंत PAN-Aadhaar लिकिंगची डेडलाइन 8 वेळा वाढली आहे. केंद्र सरकारने मनी लाँड्रिंग (पीएमएलए) कायद्याअंतर्गत बँक खातं, पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य केलं आहे. जे लोकं हे काम पूर्ण करणार नाही त्यांचे पॅन कार्ड स्विकारले जाणार नाही. त्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल. ज्या लोकांनी आधीच त्यांचे पॅन आणि आधार लिंक केले आहे त्यांना चिंता करण्याचं कोणतंही कारण नाही. हे वाचा-केवळ 999 रुपयात करा विमानप्रवास, मिळेल फ्री फ्लाइट व्हाउचर देखील; वाचा सविस्तर अशाप्रकारे तपासा पॅन-आधार लिकिंगचं स्टेटस तुम्हाला आयकर विभागाच्या नवीन पोर्टलवर जावे लागेल. याठिकाणी Link Aadhaar या पर्यायावर क्लिक करा. तुमचं स्टेटस पाहण्यासाठी Click Here वर क्लिक करा. यानंतर नवीन विंडो उघडली जाईल. याठिकाणी तुम्हाला पॅन आणि आधार लिंकिंग संदर्भात माहिती मिळेल. हे वाचा-मोदी सरकारचं शेतकऱ्यांना गिफ्ट! मिळतील 4000 रुपये, वाचा कसा आणि कुणाला मिळेल लाभ SMS च्या माध्यमातून तपासा स्टेटस याशिवाय तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक आहे की नाही हे तुम्ही SMS च्या माध्यमातून देखील तपासू शकता. याकरता तुम्हाला 567678 किंवा 56161 या क्रमांकावर SMS करावा लागेल. तुम्हाला UIDPAN नंतर बारा अंकी आधार आणि 10 अंकी पॅन क्रमांक टाइप करावा लागेल, आणि तो मेसेज वर दिलेल्या क्रमांकावर पाठवल्यावर तुमच्या पॅन-आधार लिकिंगचे स्टेटस तुम्हाला कळेल. लक्षात असूद्या की हा मेसेज तुम्हाला रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरुनच करता येईल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Aadhar card, Aadhar card link, Pan card, Pan card online

    पुढील बातम्या