ITR : इन्कम टॅक्स रिटर्न्स भरायची मुदत वाढली; आता आहे ही नवी डेडलाईन

ITR : इन्कम टॅक्स रिटर्न्स भरायची मुदत वाढली; आता आहे ही नवी डेडलाईन

इन्कम टॅक्स रिटर्न्स IT retuerns भरायची मुदत अखेर वाढवून देण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 23 जुलै : इन्कम टॅक्स रिटर्न्स ITR filing due date भरायची मुदत अखेर वाढवून देण्यात आली आहे. येत्या 31 जुलैपर्यंत रिटर्न्स भरणं बंधनकारक होतं. दरवर्षीप्रमाणे जुलै अखेर ही शेवटची तारीख इन्कम टॅक्स विभागाने जाहीर केली होती. आज ही मुदत वाढल्याची घोषणा आयकर विभागाने केली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने प्रथम कर भरण्याची मुदत वाढवली असल्याचं जाहीर केलं. आता 31 ऑगस्ट 2019 ही कर भरायची शेवटची तारीख असणार आहे.

या महिन्यात इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची सगळ्यांचीच धावपळ सुरू असते. 31 जुलै ही रिटर्न भरण्याची शेवटची तारीख होती. मुदतीत कर भरला नाही तर दंड भरायला लागतो. समजा तुम्ही दिलेल्या मुदतीच्या आत IT रिटर्न भरू शकला नाहीत तर तुमच्याकडे अजून एक संधी असते. त्या अवधीत तुम्ही रिटर्न भरून दंडापासून वाचू शकता. पण आता तत्पूर्वीच IT विभागाने मुदतवाढ जाहीर केली आहे.

फिस्कल इयर 2018-19साठी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख आहे 31 मार्च 2020. तुम्ही या तारखेपर्यंत रिटर्न फाइल करू शकला नाहीत तर मात्र तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची नोटिस मिळू शकते. जरी तुम्ही 31 मार्च 2020पर्यंत रिटर्न फाइल करू शकत असलात तरी तो जुलैमध्येच करावा. तुम्ही 31 ऑगस्ट 2019नंतर आणि 31मार्च 2020च्या आधी इन्कम टॅक्स रिटर्न भरलात तर तुम्हाला दंड बसू शकतो.

फक्त इंटरव्ह्यू घेऊन रेल्वे देतेय नोकरी, 'इथे' करा अर्ज

किती पडेल दंड?

तुम्ही 31 ऑगस्टनंतर 31 डिसेंबर 2019पर्यंत IT फाइल केलात तर तुम्हाला 5 हजार रुपये दंड भरावा लागेल. तुम्ही 1 जानेवारी 2020पासून 30 मार्च 2020पर्यंत रिटर्न भरलात तर तुम्हाला 10 हजार रुपये दंड भरावा लागेल. इन्कम टॅक्स सेक्शन 234F चा समावेश झाल्यावर लेट फाइन अनिवार्य झालीय. याआधी हे सर्व असेसिंग अधिकाऱ्यांवर अवलंबून असायचं. ते दंड लावतात की नाही ते.

छोट्या करदात्यांना किती दंड?

ज्यांची मिळकत 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि ते 31 मार्च 2020च्या आधी रिटर्न फाइल करत असतील तर जास्तीत जास्त लेट फी 1000 रुपये लागेल.

Amazonवर 9 लाखांचा कॅमेरा 6 हजार 500 रुपयांत, लोक म्हणाले 'थँक्यू बेजोस'

एखाद्या करदात्याची पूर्ण मिळकत टॅक्स स्लॅब सवलतीमध्ये येत असेल आणि त्यानं उशिरा रिटर्न भरले तर त्याला कुठलाही कर लागत नाही.

फक्त 5 हजार रुपये आणि 8वी पास, Post Office देतेय व्यवसायाची संधी

समजा एखाद्याला परदेशातल्या संपत्तीतून मिळकत होत असेल आणि ती व्यक्ती कर सवलतीच्या सीमेत असेल तरीही रिटर्न फाइल केल्यावर कर लागू शकतो.

SPECIAL REPORT : मला काँग्रेसचा अध्यक्ष व्हायचंय, पुणेकर तरुणाचा दावा

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: July 23, 2019, 9:08 PM IST

ताज्या बातम्या