Home /News /money /

करदात्यांसाठी आनंदाची बातमी! ITR भरण्याची डेडलाइन वाढवली, आता ही असणार तारीख

करदात्यांसाठी आनंदाची बातमी! ITR भरण्याची डेडलाइन वाढवली, आता ही असणार तारीख

करदात्यांना दिलासा देणारी बातमी समोर येते आहे. सीबीडीटीने आयटीआर संदर्भात एक निवेदन जारी करत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

    नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर : कोरोना काळात (Coronavirus) सरकारकडूव सामान्यातील सामान्य माणसांना आर्थिक दिलासा देण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान देशाच्या अर्थचक्रात महत्त्वाचा सहभाग असणाऱ्या करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्यासाठी सर्वसामान्यांना आणखी वेळ मिळाला आहे. सेंट्रल बोर्ड ऑप डिरेक्ट टॅक्सेस (CBDT)ने 2019-20 या आर्थिक वर्षासाठी आयकर विवरणपत्र (Income Tax Returm) भरण्यासाठीची डेडलाइन 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविली आहे. त्याचप्रमाणे ज्यांचे आयटीआर ऑडिट करणे आवश्यक आहे त्यांच्यासाठी या प्रक्रियेची अंतिम मुदत 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. सीबीडीटीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करदात्यांना आयटीआर दाखल करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळावा याकरता ही डेडलाइन वाढवली आहे. त्याचप्रमाणे CBDT ने असे म्हटले आहे की, 'ज्यांच्या खात्याचे ऑडिट करणे आवश्यक आहे (ज्यांच्यासाठी आयटी कायद्यानुसार अंतिम तारीख 31 ऑक्टोबर आहे) त्यांच्यासाठी आयटीआर दाखल करण्याची तारीख 31 जानेवारी 2021 करण्यात आली आहे.' (हे वाचा-Loan Moratorium: सरकारचा व्याजावरील व्याज माफ करण्याचा निर्णय) आयकर विभागाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून असे ट्वीट केले आहे की, ' कोव्हिड-19 मुळे करदात्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, सीबीडीटीने आथिर्क वर्ष 2019-20च्या विविध अनुपालनांच्या योग्य तारखांची मुदतवाढ केली आहे, ज्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक आहे अशा करदात्यांना आयटीआर देण्याची डेडलाइन 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे.' तुम्ही विवरणपत्र भरलं नाहीत तर? तुमचा प्रलंबित ITR तुम्ही दिलेल्या मुदतीत भरला नाहीत तर आयकर विभाग तुम्हाला नोटीस पाठवू शकतो. दिलेल्या तारखेनंतर आयकर खातं तुम्हाला कर भरण्याची परवानगी देणार नाही. सरकारने जाहीर केलेल्या तारखेनंतर कर भरण्यासाठी खूप मोठी प्रक्रिया करावी लागेत आणि अगदी विशेष परिस्थितीतच तसं करायला आयकर विभाग परवानगी देतो. उशिरा कर भरणाऱ्यांना करण्यात येणाऱ्या दंडात किंवा करावरील व्याजात कोणतीही सवलत सरकारने जाहीर केलेली नाही. त्यामुळे लवकरात  लवकर कर भरून टाकणंच फायद्याचं आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Income tax, Money

    पुढील बातम्या