Home /News /money /

भारतीय लष्कराचं मोठं फर्मान, 'फेसबुक अकाउंट बंद करा'

भारतीय लष्कराचं मोठं फर्मान, 'फेसबुक अकाउंट बंद करा'

फेसबुक अकाउंटसोबतच व्हॉट्सअ‍ॅप सारख्या मेसेजिंग अ‍ॅपवर कोणत्याही प्रकारचं औपचारिक संभाषण करू नये, असंही लष्कराने म्हटलं आहे.

    संदीप बोल नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : भारतीय लष्करामधल्या अधिकाऱ्यांचं फेसबुक अकाउंट बंद करण्याचं फर्मान लष्कराने काढलं आहे. जे अधिकारी मोठ्या पदांवर आहेत त्यांचं फेसबुक अकाउंट डिअ‍ॅक्टिव्हेट करा, असा आदेश लष्कराने काढला आहे. 'व्हॉट्सअ‍ॅप'वरही बंदी फेसबुक अकाउंटसोबतच व्हॉट्सअ‍ॅप सारख्या मेसेजिंग अ‍ॅपवर कोणत्याही प्रकारचं औपचारिक संभाषण करू नये, असंही लष्कराने म्हटलं आहे. लष्कराच्या सायबर क्राइम ग्रुपने सोशल मीडिया ट्रेंड्सचीही पूर्ण पडताळणी करण्याची शिफारस केली आहे. (हेही वाचा : इनकम टॅक्सचा हा नियम बदलणार, तुमच्यावर होणार थेट परिणाम) सध्याच्या काळात सोशल मीडियावर केलेलं संभाषण अनेक माध्यमांमधून व्हायरल होऊ शकतं. त्यामध्ये पुरेशी गुप्तता पाळली जात नाही. त्याचबरोबर सोशल मीडियावर केलेलं संभाषण हे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे बड्या लष्करी अधिकाऱ्यांनी असं संभाषण टाळावं, असं लष्कराचं म्हणणं आहे,असं म्हटलं जातं. =========================================================================================
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    Tags: Army, Facebook

    पुढील बातम्या